VIDEO | अति घाई बेतली असती जीवावर

VIDEO |  अति घाई बेतली असती जीवावर


सिग्नल पडल्यानंतरही रस्ता ओलांडण्याची अनेकांना सवय आहे...पण, ही सवय कधीतरी जीवावर बेतू शकते, असाच प्रकार आता समोर आलाय. रेल्वे क्रॉसिंग असल्यानं फाटक लावला होता.रेल्वे येण्याची वेळ झाल्यानं गेटमन फाटक खाली पाडत होता. पण, फाटक पडण्याआधीच जाण्याची घाई या बाईकस्वारला होती...बाईकचा वेग वाढवला आणि वेगानं बाईक नेण्याचा प्रयत्न केला... पण, त्यावेळीच फाटक पडल्यानं त्याला बाईकवर नियंत्रण मिळवता आलं नाही. आणि या फाटकाला जाऊन जोरात धडकला. आता पुन्हा एकदा पाहा, किती वेगानं हा बाईकस्वार फाटकाला धडकला...

फाटकाला धडकल्यानं ही व्यक्ती जोरात कोसळली. डोक्यात हॅल्मेट होतं म्हणून मोठ्या नशीबानं याचा जीव वाचला.. पण, फाटकाच्या गेटला बाईक धडकल्याने बाईकचं नुकसान झालं. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. ही घटना गुजरातच्या वलसाडमधील उदवारा रेल्वे फाटकाजवळ घडलीय. या व्यक्तीनं हेल्मेट घातलं होतं म्हणून जीव वाचलाय. त्यामुळं तुम्हीही बाईक चालवताना हेल्मेट वापरा आणि तुम्ही अशी घाई करू नका.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com