पुणे जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 34 कोटी 95 लाखाचा निधी

पुणे जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 34 कोटी 95 लाखाचा निधी

शिर्सुफळ (पुणे) - महाराष्ट्रशासनाच्या संकेतस्थळावर ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या आदेशात, ग्रामविकास खात्याच्या 'मुख्यमंत्री ग्रामसडक योजने'अंतर्गत जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या 18 रस्त्यांच्या 53 किलोमीटर अंतराचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

ग्रामविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या योजने अंतर्गत, पुणे जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 18 रस्त्यांच्या कामासाठी 34कोटी 95लाख 71हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. तेसच या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आणि 5 वर्षे देखभाल करण्यासाठी 2कोटी 16लाख 33हजार रुपयांचा वेगळा निधी देण्यात येणार आहेत. यामाध्यमातुन सुमारे 53किलोमीटरचे पक्के रस्ते होणार आहेत. विशेष बाब म्हणजे यासाठी डांबरामध्ये वेस्ट प्लास्टिकचा वापर होणार आहे. त्यामुळे गाव तेथे पक्का रस्ता हे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.

या योजने अंतर्गत होणारे रस्ते आणि मिळणारा निधी,
- बारामती तालुक्यातील वाणेवाडी (प्रजिमा 68) ते साळोबावस्ती रस्ता (2कोटी 34लाख)
- भोर तालुक्यातील प्राथमिक जिल्हा मार्ग 144 ते शिवनगरी वडतुंबी (1कोटी 50लाख)
- प्राथमिक जिल्हा मार्ग 45 ते कुपडनेवाडी (95लाख 30हजार)
- दौंड तालुक्यातील हंडाळवाडी ते पारगाव (87लाख 36हजार)
- रावणगाव (प्रजिमा 80) ते नांगरेवस्ती (3कोटी 24लाख)
- पडवी ते देशमुख वस्ती (94लाख 74हजार)
- हवेली तालुक्यातील राज्य मार्ग 09 ते पेठ (1कोटी 12लाख)
- खरमरी ते दुरुगदरा भिल्लारेवाडी रस्ता (1कोटी 67लाख)
- आर्वी ते तानाजीनगर रस्ता (1कोटी 37लाख)
- गाउडदरा ते रामोशी वस्ती (1कोटी 38लाख)
- मुळशी तालुक्यातील मुकाईवाडी ते मतेवाडी रस्ता (1कोटी 54लाख)
- शिरुर तालुक्यातील वडु ब्रु. ते आपटी रस्ता (2कोटी 87लाख)
- निमगाव दुडे ते नरवडे मळा पोटेवस्ती रस्ता (3कोटी 81लाख)
- निमगाव दुडे ते रावडे वाडी रस्ता (1कोटी 33लाख)
- खेड तालुक्यातील औदर ते विठ्ठलवाडी भरतेवाडी रस्ता (3कोटी 31लाख)
- तर पुरंदर तालुक्यातील वारवडी ते दरेवाडी पठारवाडी रस्ता (3कोटी 94लाख)
- पानवडी ते पागेवाडी (1कोटी 22लाख), केतकावळे ते धनगर वस्ती (कुंभोशी) (1कोटी 48लाख)

अशा प्रकारे वरिल 52.95 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामांना ग्रामविकास विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

या रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या मुख्य अभियंत्यांकडून तांत्रिक मान्यता देण्यात येणार आहे त्यानंतर रस्त्याचे काम सुरु होईल. यासाठी रसत्यांची पहाणी करण्यात येणार आहे.

रस्ते बांधणीसाठी होणार वेस्ट प्लास्टिकचा वापर...
डांबरी रस्त्यांची वारंवार दुरूस्ती करावी लागते. निकृष्ट कामामुळे अनेकदा डांबरीकरणानंतर असे रस्ते उखडतात. त्यावर पर्याय म्हणून प्लास्टिक रस्त्याची संकल्पना पुढे येत आहे. त्यामुळे रस्त्यांचे डांबरीकरण करताना त्याच्या अस्तरीकरणामध्ये वेस्ट प्लॅस्टिकचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास विभागाने संकेतस्थळावरील आदेशात दिली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com