VIDEO | चौथ्या मजल्यावर खिडकीत खेळतेय चिमुरडी

VIDEO | चौथ्या मजल्यावर खिडकीत खेळतेय चिमुरडी


...हा व्हिडीओ पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल...तीन वर्षांची ही चिमुरडी...पालकांची नजर चुकवून खिडकीतून बाहेर आली...मज्जा म्हणून ती खिडकीच्या बाहेरील भिंतीवरून चालत होती...आपण काय करतोय हेदेखील या चिमुरडीला कळत नसेल... खिडकीला ग्रीलही नाही, त्यामुळं या चिमुरडीचा जीव धोक्यात आहे.. वरून खाली पाहिलं तरी चक्कर येईल, एवढ्या उंचावर ही चिमुरडी चढलीय...उरात धडकी भरवणारा हा व्हिडीओ पाहा...या चिमुरडीसोबत पुढे काय झालं...बघा कशी ही चिमुरडी बिनधास्तपणे खिडकीजवळील भिंतीवरून चालतेय... चिमुरडी आनंदानं उड्या मारत होती...
या भिंतीच्या सहाय्याने ती बाल्कनीत जाण्याचा प्रयत्न करत होती...पण तिला आतमध्ये जायला जमेना...बाल्कनीत जायला जमलं नाही, तेव्हा ती परत खिडकीकडे  गेली. 


लांबून बघणाऱ्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या...पण, कुणीही बाळाच्या मदतीसाठी धावू शकत नव्हतं...खालून आरडाओरड केली असती तर बाळ घाबरून खाली पडलं असतं...त्यामुळं कुणीही आरडाओरड केली नाही... मग पुढे काय झालं पाहा...चिमुरडी पुन्हा मागे फिरली आणि खिडकीतून घरात गेली...हा सगळा प्रकार एका व्यक्तीनं आपल्या मोबाईलमध्ये कैद केला...काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ आता व्हायरल होतोय...


सुदैवानं या सगळ्या प्रकारात चिमुरडीला कोणतीही दुखापत झाली नाही...पण, चालताना खाली तोल गेला असता तर ही चिमुरडी चौथ्या मजल्यावरून खाली पडली असती...बिल्डिंगच्या खाली काँक्रिट असल्यामुळे तिच्या जीवालाही धोका निर्माण झाला असता...त्यामुळं पालकांनो जर घरात लहान मुलं असतील तर काळजी घ्या...हा धक्कादायक प्रकार स्पेनच्या डेजे बेटावर पाहायला मिळालाय...

WebTittle :: BABY plays in the window on the fourth floor

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com