BREAKING | आजपासून सलून सुरू होणार पण ...

BREAKING | आजपासून सलून सुरू होणार पण ...


मुंबई -सलून पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी सांगितले की, राज्यात सलून सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी केवळ केशकर्तन करता येईल. त्यामुळे काही जिल्ह्यांतील सलून चालकांमध्ये नाराजी असून याच्या निषेधार्थ ते सलून बंद ठेवणार आहेत. दुसरीकडे ग्राहक कमी असल्याने जे चालक सलून सुरू करणार आहेत ते ५० ते ६० टक्के दर वाढविणार असल्याचे समजते.

राज्य सरकारने ‘पुनश्च हरिओम’अंतर्गत २८ जूनपासून काही अटी-शर्तींसह सलून उघडण्यास परवानगी दिली आहे. परंतु काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी/आयुक्तांनी परवानगीचे आदेश दिले आहेत, तर काही ठिकाणी आदेश निघाले नाहीत. त्यामुळे सलून चालकांमध्ये संभ्रम आहे.

शासनाने केवळ केशकर्तनाची परवानगी दिली असली तरी अनेक वृद्ध सलून चालक आहेत ते केवळ दाढीच करतात. दाढी करण्यास परवानगी नसल्याने त्यांचे हाल होतील. सरकारने सलून चालकांची बैठक घेऊन यासंदर्भातही निर्णय घ्यावा.याबाबत मुंबई सलून ब्यूटी पार्लर असोसिएशनचे सचिव प्रकाश चव्हाण म्हणाले की, २८ जून म्हणजे आजपासून सलून सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, मुंबई आणि ठाणे परिसरात जिल्हाधिकारी/पालिका आयुक्तांचे आदेश निघाले नाहीत. त्यामुळे संभ्रम आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com