VIDEO | एकदा बघाच! सॅनिटायजर लावणाऱ्या या पोलिसांचा डान्स प्रभुदेवालाही लाजवेल

VIDEO | एकदा बघाच! सॅनिटायजर लावणाऱ्या या पोलिसांचा डान्स प्रभुदेवालाही लाजवेल

केरळ - आपल्या देशात किती गंभीर परिस्थिती असो, त्यातूनही अनोखा शब्दांचा अर्थ सातत्यानं समजावून सांगणाऱ्या घटना समोर येत असतात. अशीट घटना समोर आली आहे, त्रिवेंद्रममधून. 

वर्दीतल्या दर्दी पोलिसांचा सुंदर आवाज तर आपण ऐकलाय. पण आता पोलिसांनी चक्क डान्स केला आहे. हा डान्स साधासुधा नाही, तर एकदम खास आहे. याचं कारण आहे, कोरोना. कोरोनाला रोखण्यासाठी सध्या सगळीकडून जनजागृती केली जाते आहे. अशातच त्रिवेंद्रमच्या पोलिसांनीही आपली क्रिएटीव्हीटी दाखवली आहे. हा डान्स बघून चांगल्यातला चांगला कोरिओग्राफरही लाजून जाईल. 

तोंडाला मास्क लावून त्रिवेंद्रम पोलिसांनी हॅन्डवॉश कसं लावायचं, हे दाखवलं आहे. त्रिवेंद्रम पोलिसांचा हा डान्स सध्या तुफान वायरल होतोय. या डान्सची सध्या तुफान चर्चा आहे. नाचून हॅन्डवॉश लावल्यानं कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची काही खात्री नाही. पण किमान कोरोनामुळे आलेली भीती आणि दडपण तरी काही प्रमाणात कमी होईल, याची गॅरंटी आहे. त्यामुळे हा डान्स पाहा.. आणि कोरोनामुळे भयभीत झाला असाल, तर थोडंसं तुमच्या मनावरचं दडपणही कमी होईल, यात शंका नाही...

पाहा VIDEO 

आतापर्यंत कोरोनामुळे महाराष्ट्रात 42 जण बाधित झाले आहेत, तर केरळ आणि कर्नाटकतही कोरोनाचा संसर्ग वाढतोय. या तिनही राज्यात सध्या सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांना रोखण्याचं आव्हान सध्या प्रशासनासमोर आहे. 

corona dance video for handwash mask viral keral marathi food health maharashtra india covid 19

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com