तळोजा कारागृहातील कैदी कोरोनामुळे धास्तावले; अनेकांचा मृत्यू; चौकशीची मागणी! 

तळोजा कारागृहातील कैदी कोरोनामुळे धास्तावले; अनेकांचा मृत्यू; चौकशीची मागणी! 
Taloja Jail

ठाणे : तळोजा कारागृहात Taloja Jail कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे. त्यामुळे अनेक कैदी कोरोनाबाधित Corona Positive झाले असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. तर याप्रकरणी तळोजा कारागृहाचे अधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर यांच्या विभागीय चौकशीची मागणी आरटीआय RTI कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी केली आहे.  Corona Took Toll in Thane District Taloja Jail

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पोलीस महानिरीक्षक शेरिंग दोरजे आणि पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद (जेल) यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तळोजा कारागृहात कैद्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक कैद्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असूनही तुरुंग प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मुळात तळोजा तुरुंगात कैद्यांची कोरोना चाचणीच केली जात नाही. तळोजा तुरुंगात फक्त तीन बीएएमएस BAMS डॉक्टर आहे. एमबीबीएस MBBS डॉक्टर नसल्याने कैद्यांना उपचार सुद्धा बरोबर होत नाही आहेत  असे या तक्रारीत म्हटले आहे. 

हे देखिल पहा - 

तळोजा तुरुंगाच्या एकूण २३१ कर्मचाऱ्यांना पैकी ११० कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करण्यात आले आहे. त्यात एकूण ५१ कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. तुरुंगात ४५ वयाच्या वर एकूण ३२१ कैदी आहेत त्यात फक्त ४४ कैद्यांचे लसीकरण झाले आहे. तळोजा जेलच्या कैद्यांची क्षमता २१२४ आहे मात्र आजही एकूण ३२५१ कैदी ठेवण्यात आले आहेत. पाणी टंचाई व इतर सुविधांचा अभावामुळे कैदी त्रस्त होत आहे. Corona Took Toll in Thane District Taloja Jail

दरम्यान हे  मानव अधिकाराचे उल्लंघन असल्याचे शकील अहमद शेख यांनी म्हटले आहे. संविधानाने सर्वांना सन्मानपूर्वक जगण्याचे अधिकार दिले आहेत. तुरुंगातही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या प्रमाणावर कैद्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. सर्व राज्यांतील उच्च स्तरीय समितीने गेल्या वर्षी जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार कैद्यांना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

गेल्या वर्षी कोर्टाने सर्व कैद्यांना जामिनावर सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अनेक कैद्यांना सोडण्यात आले होते. त्यानंतर सोडण्यात आलेले सर्व कैदी परत तुरुंगात आले आहेत. अनेक तुरुंगामध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी भरलेले आहेत. त्यामुळे कैदी आणि कर्मचारीही संक्रमित होत आहेत.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com