धारावीची पुन्हा एकदा कोरोनामुक्तीकडे वाटचाल   

धारावीची पुन्हा एकदा कोरोनामुक्तीकडे वाटचाल   
corona dharavi

धारावी - कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. यंदा महाराष्ट्रात Maharashtra तर कोरोनाने कहर केला असून उपचारा अभावी अनेक लोकांचा मृत्यू होत आहे.  कोरोनाच्या Corona  संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने Government कडक निर्बंध लावले आहेत.  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देखील पहिल्या लाटेप्रमाणे सर्वाधिक प्रसार होणाऱ्या धारावीत Dharavi आता कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं समोर येत आहे . गेल्या काही दिवसात कमी रुग्ण Patients आढळत असल्यामुळे प्रशासनाने निश्वास सोडला आहे . 

धारावीत गेल्या १३ दिवसात फक्त २१७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात तिसऱ्यांदा धारावीत केवळ ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता धारावीतील कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हे देखील पहा -

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी Slum Area म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत कोरोनाची  दुसरी   लाट आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे . कारण मागील महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसाला ७० हुन अधिक रुग्ण आढळून येत होते त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे .  गेल्या १३ दिवसात २१७ रुग्णांची नोंद झालीय . तर गेल्या चार दिवसात तिसऱ्यांदा ९ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे धारावीतील कोरोना आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे . Dharavi is on its way to corona free once again

धारावीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६६६२ इतकी आहे. त्यापैकी ५७०२ रुग्ण  बरे झाले आहेत . तर सध्या धारावीत सक्रिय ररूग्णांची संख्या ६१६ इतकी आहे. धारावीत 8 मार्चला 18 रुग्ण आढळले होते. त्यानंतर सतत रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती 11 एप्रिलला धारावीत 76 नवे रुग्ण आढळून आले होते. पण आता पुन्हा ही संख्या घटू लागली आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com