VIDEO| पाण्यात गुदमरतोय माशांचा जीव ?

VIDEO| पाण्यात गुदमरतोय माशांचा जीव ?

प्लास्टिकवर बंदी आलीय तरीदेखील प्लास्टिकचा वापर सर्रास केला जातोय...लपून छपून लोक प्लास्टिक वापरतायत...आणि कुठेही फेकून देतात...याच प्लास्टिकचा फटका माशांनाही बसतोय...या व्हिडीओत बघा, हा मासा प्लास्टिकच्या पिशवीत अडकलाय...पण, प्लास्टिकच्या पिशवीतून बाहेर पडणं या माशाला जमत नाहीये...बिचाऱ्या माशानं अनेक प्रयत्न केले पण, त्याची सुटका काही होईना...त्याचा जीव गुदरमला होता...अजून थोडा उशीर झाला असता तर या माशानं जीव गमावला असता...पण, या माशाचं नशीब चांगलं म्हणून मोठ्या संकटातून त्याची सुटका झाली...

...हा व्हिडीओ आता व्हायरल होतोय...मासा प्लास्टिकच्या पिशवीत अडकल्याने त्याची सुटका होत नव्हती...प्लास्टिकमधून सुटका करण्याचा मासा प्रयत्न करत होता...पण, प्लास्टिकमुळं कुणाचाही जीव जाऊ शकतो हे या व्हिडीओतून समोर आलंय...त्यामुळं प्लास्टिकवर बंदी असली तरीदेखील घरात असलेलं प्लास्टिक कुठेही फेकू नका...

WebTittle:: The fish lives in the water?

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com