VIDEO | शंभर डॉलरच्या नोटेवर महाराजांचा फोटो ?

VIDEO | शंभर डॉलरच्या नोटेवर महाराजांचा फोटो ?

सोशल मीडियावर अमेरिकेतील 100 डॉलर्सच्या नोटेचा फोटो व्हायरल होतोय...अमेरिकेने 19 फेब्रुवारी शिवजयंतीला जागतिक छत्रपती दिन म्हणून घोषित केल्याचा दावा करण्यात आलाय...एवढेच नाही तर शंभर डॉलरच्या नोटेवरसुद्धा महाराजांचा फोटो छापल्याचं म्हटलंय...पण, अमेरिकेनं खरंच नोटेवर महाराजांचा फोटो छापलाय का...? याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला...पण, मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहा...

शिवाजी महाराजांचा फोटो असलेल्या 100 डॉलर्सच्या नोटेचा फोटो आहे.19 फेब्रुवारी हा दिवस अमेरिकेने जागतिक छत्रपती दिन म्हणून घोषित केलाय.डॉलर्सच्या नोटेवर महाराजांचा फोटोही छापलाय.


...हा मेसेज व्हायरल करण्यात आलाय...भारताला मिळालेला हा शिवराय यांच्यामुळे आणखी एक मोठा सन्मान आहे असा दावा करण्यात आलाय...इतकंच नव्हे तर जे काम भारताने करायला हवे ते अमेरिकने करून दाखवलंय असंही मेसेजमध्ये लिहिण्यात आलंय...पण, खरंच अमेरिकेने 100 डॉलरच्या नोटेवर महाराजांचा फोटो छापलाय का...? याची सत्यता जाणून घेण्याचा आमच्या व्हायरल सत्य टीमनं प्रयत्न केला...''

अमेरिकेने खरंच असा काही निर्णय घेतलाय का याची पडताळणी करत असताना कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही...याची बातमीही कुठे दाखवण्यात आलेली नाही...छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे जर अमेरिकेने असा निर्णय घेतला असता तर नक्कीच मोठी बातमी झाली असती...पण,असं काहीच आढळलं नाही...त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा...

अमेरिकेने 19 फेब्रुवारी जागतिक छत्रपती दिन म्हणून घोषित केलेले नाही

शंभर डॉलर्सच्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापलेला नाही

महाराजांचा फोटो एडिट करून नोटेवर लावण्यात आलाय

1914 सालापासून शंभर डॉलर्सच्या नोटेवर बेंजमिन फ्रँकलिन यांचाच फोटो आहे


अमेरिकेत 1914 मध्ये सर्वप्रथम शंभर डॉलरची नोट चलनात आली...अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बेंजमिन फ्रँकलिन यांचे छायाचित्र वापरण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत नोटेवर बेंजमिन फ्रँकलिन यांचाच फोटो कायम ठेवण्यात आलाय...लोकांची दिशाभूल करण्यासाठी चुकीचा मेसेज व्हायरल केला जातोय...त्यामुळं तुम्हाला हा मेसेज आला तर पुढे फॉरवर्ड करू नका...आमच्या पडताळणीत अमेरिकेत 100 च्या डॉलर्सवर महाराजांचा फोटो असल्याचा दावा असत्य ठरला...

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com