सुमित्रा भावे : वेगळ्या धाटणीच्या सिनेमांचे पर्व आणणाऱ्या प्रतिभावंत दिग्दर्शिका

सुमित्रा भावे : वेगळ्या धाटणीच्या सिनेमांचे पर्व आणणाऱ्या प्रतिभावंत दिग्दर्शिका
Sumitra Bhave

पुणे:  सिनेमा आणि त्या सिनेमात प्रत्येक वेळा काही वेगळपण सोडणाऱ्या कलावंत म्हणजे ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे Sumitra Bhave.  आज सकाळी त्यांच्या जाण्याच्या बातमीनं सगळ्यांच मराठी सिनेसृष्टीला Film Industry धक्काच बसला. सुमित्रा भावे यांनी व्याच्या ७८ वर्षी पुण्यात Pune खासगी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. Marathi cinema director Sumitra Bhave passes away

सुमित्रा भावेंची सुरुवात : 
सुमित्रा भावे यांचा जन्म १२ जानेवारी १९४३ मध्ये पुण्यात झाला. फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी मिळविल्यानंतर मुंबईतील टाटा समाजविज्ञान संस्थेतून त्यांनी ग्रामीण विकास या विषयात पदविका मिळविली. पूर्ण वेळ समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करत अस्ताना त्यांना सिनेसृष्टी या क्षेत्रात काही करण्याची आवड निर्माण झाली.  आणि मग काय वेगळा धाटणीच्या सिनेमाचे पर्व सुरू झालं. आणि या पर्वाचं नाव ठरलं सुमित्रा भावे पर्व. 

सुमित्रा भावेंची चित्रपट क्षेत्रातील कारकिर्द :
सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक Director सुनील सुकथनकर Sunil Sukhtankar यांच्यासह अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती केली. 'बाई', 'पाणी' या सुरुवातीच्या लघुपटांना लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये 'दोघी' हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार केला. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले 'दहावी फ', 'वास्तुपुरुष', 'देवराई', 'बाधा', 'नितळ', 'एक कप च्या', 'घो मला असला हवा', 'कासव', 'अस्तु' हे चित्रपट गाजले. विशेष म्हणजे त्यांच्या पहिलाच सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार National Award मिळाला होता. Marathi cinema director Sumitra Bhave passes away

मराठी सिनेमाचं वेगळेपण म्हणजे सुमित्रा भावे:
मराठी सिनेमाचं वेगळेपण म्हणजे सुमित्रा भावे ही गोष्ट ठरलेलीच होती.  त्यामुळे अनेक आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुमित्रा भावे यांचा सिनेमा दाखवला गेला. एवढंच नव्हे तर सुमित्रा भावे यांचा सिनेमा "अस्तू" ला सुवर्ण कमळ हा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बहुमान देण्यात आला होता.  खरचं मराठी सिनेमा वेगळा आहे आणि आमची संहिता हीच खरी सुपरस्टार आहे हे जगाला दाखवून देणारया ज्येष्ठ दिग्दर्शिकेला साम टीव्हीचा सलाम... 

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com