VEDIO | मांजराने वाचवला बाळाचा जीव!

VEDIO | मांजराने वाचवला बाळाचा जीव!

कुत्रा हा घराची राखण करतो...पण, मांजरही घराची राखण करते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या घरातील मांजरानं काय केलं बघा. मांजरानं जे काही केलं ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला. असं काय केलं मांजरानं पाहुयात...

मांजरानं एका बाळाचा जीव वाचलाय. घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद झालाय. 1 वर्षांचं बाळ घरामध्ये खेळत होतं. खेळता खेळता हे बाळ जिन्याच्या दिशेनं रांगत रांगत चाललं होतं. अजून थोडा उशीर झाला असता, तर या जिन्यावरून बाळ खाली कोसळलं असतं. पण, मांजरानं बाळाकडे पाहिलं आणि पटकन जाऊन या बाळाला मागे केलं. आता पाहा, या व्हिडीओत. बाळ जिन्यावर जाणार तितक्यातच या मांजरानं बाळाला मागे सारलं. आणि हे बाळ जिन्यावरून पडता पडता वाचलं.

हा सगळा प्रकार कोलंबियामध्ये पाहायला मिळालाय.12 पायऱ्यांच्या जिन्यावरून हे बाळ कोसळलं असतं तर त्याला गंभीर दुखापत झाली असती. मात्र, या गुणी मांजरानं तातडीनं बाळाला मागे ढकललं. आणि मोठा अनर्थ टळला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्यानं मांजराचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

आजकालच्या धकाधकीच्या दिवसात पालकांचं आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होत असतं. पण, हे मांजर या बाळावर लक्ष ठेवून होतं. मुक्या प्राण्यानं बाळावर लक्ष ठेवून त्याचा जीव वाचवलाय. आता हा व्हिडीओ व्हायरल होत असून, गुणी मांजराचं कौतुक होतंय.

Web Title - marathi news cat saves babies life...

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com