VIDEO | चलनी नोटा आरोग्यासाठी घातक ?

VIDEO | चलनी नोटा आरोग्यासाठी घातक ?

...तुम्ही वापरत असलेल्या नोटा तुम्हाला आजारी पाडू शकतात...(प्ले व्हिज) हे ऐकून तुम्हाला खरं वाटणार नाही...पण, आपल्या खिशातल्या नोटा आरोग्यासाठी किती घातक आहेत ते व्हिडीओ पाहिल्यानंतरच कळेल...(प्ले व्हिज) या व्हिडीओत पाहा...नोटांवर किती प्रमाणात बुरशी असते हे आपल्याला कळतंच नाही...पण, जालनातील स्वामी विवेकानंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नोटांवर संशोधन केल्यामुळं हा धक्कादायक प्रकार समोर आलाय...
बघा, नोटांवर किती बुरशी असते...व्यापारी, भाजीवाला, शेतकरी, कर्मचारी, फेरीवाले आणि तुम्ही आम्ही...दहा, वीस, पन्नास, शंभर, दोनशे, पाचशे, दोन हजारच्या नोटा चलनात सगळीकडे फिरत असतात...त्यामुळं नोटांवर बुरशी लागते हे एक महिना संशोधन केल्यानंतर समोर आलं...एक दोन नव्हे तर तब्बल सोळा प्रकारच्या बुरशी नोटांवर असल्याचं उजेडात आलंय...

दररोज चलनी नोटा घामाच्या संपर्कात आल्यास बुरशीला खाद्य मिळते...आणि परिणामी नोटांची झीज झाल्याने अशा नोटा खिशात राहिल्यास त्वचेचे आजार होतात...यामुळे चलनी नोटा आरोग्यास घातक असल्याचं तज्ज्ञ सांगतात...

त्यामुळे तुम्ही नोटा बाळगताना, आर्थिक व्यवहारासोबतच आरोग्याची काळजी घ्या...नोटा आपल्याकडून दुसरीकडे, दुसऱ्याकडून आपल्याकडे फिरत असतात...नोटांवर बुरशी पकडलेली आपल्याला दिसून येत नाही...नोटांमुळे आपण आजारी पडू शकतो हा दावा सत्य ठरला...त्यामुळे तुम्ही नोट वापरताना काळजी घ्या...

WebTittle ::Is currency nota dangerous to health?

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com