इंग्लंडच्या ब्लेहनेम पॅलेसमध्ये चोरी; सोन्याचं टॉयलेटवर चोरांचा डल्ला

इंग्लंडच्या ब्लेहनेम पॅलेसमध्ये चोरी; सोन्याचं टॉयलेटवर चोरांचा डल्ला

...होय, चोरट्यांनी हिरे, दागिने नव्हे तर चक्क टॉयलेटच पळवलंय. ते ही 18 कॅरेट सोन्याचं. ही विचित्र पण तितकीच धक्कादायक घटना घडलीये इंग्लंडच्या ब्लेहनेम पॅलेसमध्ये. पॅलेसमध्ये आयोजित एका प्रदर्शनात सोन्याने मढवलेलं 35 कोटींचं टॉयलेट ठेवण्यात आलं होतं आणि चोरांनीही संधी साधत हे टॉयलेट, चक्क जमिनीसह उखडून नेलं. 

इटालीयन मैरिजियो केटेलने हे सोन्याचं टॉयलेट तयार केलं होतं. 18 व्या शतकातील ब्लेनहेम पॅलेसमधील आकर्षण म्हणजे हे सोन्याचं टॉयलेट. विन्सटन चर्चिल यांचा जन्म याच पॅलेसमध्ये झाला होता. या सोन्याच्या टॉयलेटमुळे या पॅलेसला चार चाँद लागले होते. मात्र कडेकोट सुरक्षा असतानाही, गार्डसच्या नाकावर टिच्चून हे सोन्याचं टॉयलेट पळवलंय.

पिवळं धम्मक टॉयलेट पळवण्याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय खरं, पण ते 35 कोटींचं टॉयलेट तेवढं अद्यापही पोलिसांच्या नजरेपासून दूरच आहे.

WebTitle : marathi news gold toilet stolen from blenheim palace England

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com