100 रुपयांच्या चलनी नोटेला मिळणार नवी झळाळी 

100 रुपयांच्या चलनी नोटेला मिळणार नवी झळाळी 

मुंबई: नोटाबंदीनंतर आलेल्या 100 रुपयांच्या चलनी नोटेला आता नवी झळाळी मिळणार आहे. दोनशे, पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटेबरोबर जांभळ्या रंगाच्या नव्या 100 रुपयांच्या नोटेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आता या नोटेला वॉर्निश लावण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात प्रसिद्ध केला आहे. याशिवाय अंधांना हाताळता याव्यात यासाठी नोटा अधिक सोयीस्कर बनविणे याप्रकारच्या योजना अहवालात सादर केल्या आहेत. अंध किंवा अंशत: अंधांसाठी नोटा हाताळणे अधिक सुकर होण्यासाठी प्रिंटींग, टॅक्टिकल मार्क, आकार, मोठे आकडे आदि बाबींचा विचार करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने दिला आहे. 

चलनात नवीन नोट येणार असली तरी जुनी नोट देखील चलनात कायम राहणार आहे. शिवाय नोटबंदीनंतर जांभळ्या रंगाची जी नोट चलनात आणली होती त्यापेक्षा नवीन नोट आणखी चकाकणार आहे. 

100 रुपयांची नोट ही साधारणतः सर्वात जास्त वापरली जाणारी नोट आहे. परिणामी ती लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेने १०० रुपयांच्या नोटांना वार्निशचा कोट देण्याचे ठरवले आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर काही नोटांना कोटिंग केले जाणार आहे. नोटेचे आयुष्य वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँक हा प्रयोग करत आहे. प्रयोग यशस्वी झाल्यास 100 रुपयांच्या सर्व नोटांना वॉर्निश कोट लावला जाईल. नोटांच्या गुणवत्तेकडे लक्ष ठेवण्यासाठी मुंबईत बँक नोट क्वालिटी अॅश्युअरन्स प्रयोगशाळा देखील स्थापन करण्यात आली आहे.

WebTitle : marathi news hundred rupees note to shine a bit extra RBI planning to apply warnish on the note  

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com