VIDEO | तुमचा मास्कच ठरू शकतो धोकादायक

VIDEO | तुमचा मास्कच ठरू शकतो धोकादायक

कोरोनाच्या भीतीनं तुम्ही मास्क वापरताय, पण लक्षात ठेवा, एकच मास्क वारंवार वापरणं धोक्याचं ठरू शकतं. खरेदी केलेला एकच मास्क सात ते आठ दिवस वापरत राहिल्यास संसर्गाचा धोका वाढत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय.

ही आहेत कारणं - 

  • एकच मास्क वारंवार वापरल्यानं जंतुसंसर्गाचा धोका वाढतो.
  • एका वेळी एकच मास्क वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.
  • एकदा वापरलेला मास्क योग्य पद्धतीने नष्ट करावा असंही सुचवण्यात आलंय.
  • मास्क काढताना मागून काढावा आणि
  • मास्कला पुढून स्पर्श करणं टाळावं असंही सांगण्यात आलंय.

मुळात सर्वांनी मास्क वापरण्याची गरज नसल्याचं आणि केवळ सर्दी, ताप, खोकला असणाऱ्यांनीच मास्क वापरायला हवा असंही तज्ज्ञांनी सुचवलंय. कोरोनाने आधीच सगळे टेन्शनमध्ये आहेत, त्यामुळे बचावासाठी प्रत्येकजण मास्क वापरतोय, मात्र एकच मास्क सतत वापरत राहिल्याने धोका अधिक वाढतो, त्यामुळे मास्क वेळोवेळी बदलणं गरजेचंय.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com