मोदी आणि उद्धव ठाकरे आज एकाच मंचावर

मोदी आणि उद्धव ठाकरे आज एकाच मंचावर

मुंबई : आज होणाऱ्या महायुतीच्या प्रचारसभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण या सभेत मोठे भाऊ आणि लहान भाऊ एकत्र उपस्थित राहणार आहेत. म्हणजेच आजच्या या प्रचारसभेत नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्याआधी एक दिवस होणारी ही सभा महत्त्वाची मानली जातेय. मुंबईतल्या बीकेसीमध्ये शिवसेना आणि भाजपची एकत्रित पहिलीच प्रचारसभा पार पडणार आहे.

जागावाटपानंतर भाजप शिवसेनेमध्ये स्थानिक पातळीवर बंडखोरांनी डोकं वर काढलंय. अशात महायुतीचे अनेक बंडखोर एकमेकांविरोधात उभे आहेत. या पाश्र्वभूमीवर युतीच्या सर्वोच्च नेत्यांच्या या पहिल्या व शेवटच्या संयुक्त प्रचार सभेत काय संदेश देतात याबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष या सभेकडे लागलंय. 

Web Title - TODAY  MODI AND UDDHAV THAKAREY ON ONE STAGE 

हे ही पाहा - https://youtu.be/fcxvj8EZ8T8

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com