VIDEO | हवेत आणि रस्त्यावर चालणारी कार तयार !

VIDEO | हवेत आणि रस्त्यावर चालणारी कार तयार !

फिरायला जाताना आता ट्रॅफिक लागलं तर काळजी करायची गरज नाही...कारण, ट्रॅफिक कितीही असलं तरी आपल्या वेळेतच आपण पोहोचू शकतं...अशी एक कार तयार करण्यात आलीय

हवेत उडणारी आणि रस्त्यावर चालणारी कार तयार झालीय...काहीच दिवसात ही कार आपल्याला पाहायला मिळेल...हवेत ताशी 321 किमी वेगानं तर रस्त्यावर 160 किमी ताशी वेगानं ही कार धावेल...
हवेत आणि रस्त्यावरही ही कार चालत असल्यानं ट्रॅफिकपासून सुटकारा मिळेल...या कारला पायनियर पर्सनल एअर लॅन्डिंग व्हिएकल असं नाव देण्यात आलंय...यामध्ये रिट्रक्टेबल ओव्हरहेड आणि रियर प्रोपेलर लावल्यामुळं ही कार हवेत 12 हजार पाचशे फूट उंच उडू शकेल...
 

दोन सीटर असलेल्या या कारला 230 हॉर्स पावरचं इंजिन लावलंय...त्यामुळं भन्नाट वेगानं ही कार चालते...हवेत आणि रस्त्यावर ही कार चालत असल्यानं कारची किंमतही तेवढीच महाग आहे...तब्बल 4 कोटी 30 लाख रुपये इतकी किंमत या कारची आहे...आतापर्यंत 70 कारची बुकिंग झालीय...आता जरी कार बुकिंग केली असली तरीदेखील 2021 मध्ये ही कार उपलब्ध होणाराय...पण, आपल्याकडे पैसे असले तरीही कार घेण्यासाठी एक अट आहे...ही कुणीही खरेदी करू शकत नाही...ही कार चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स हवंच, त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे पायलटच लायसन्सही असणं गरजेचं आहे...
 

WebTittle :: Ready to drive cars in the air and on the road!


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com