VIDEO | राष्ट्रवादी राजवटीतही कशी असेल सेनेला संधी? मात्र पेच कायम
SHIVSENA CHANCE TO POWER SET UP IN PRESIDENT RULES

VIDEO | राष्ट्रवादी राजवटीतही कशी असेल सेनेला संधी? मात्र पेच कायम

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी शिवसेनेला सत्तेची संधी आहे..अर्थात सेनेच्या सत्तास्थापनेचा चेंडू पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कोर्टात असेल..तो कसा, पाहुयात या सविस्तर विश्लेषणातू...


गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरूंय. शिवसेना सत्तेच्या जवळ पोहचल्यानंतरही आघाडीकडूनही पाठिंब्याचं पत्र न मिळाल्यानं शिवसेनेला मोक्याच्या क्षणी रिकाम्या हातानं परतावं लागलं. असं असलं तरी या परिस्थितीतही शिवसेनेला सत्तास्थापनेची संधी असेल. काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र राजभवनला पोहोचल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकत्रितपणे सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केलं जाऊ शकतं, असं जाणकार सांगतात.

शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा कायम आहे, मात्र राज्यपालांनी वाढीव वेळ देण्यास नकार दिला, त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली. काँग्रेसची भूमिका स्पष्ट नसल्यानं अगदी हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास सेनेच्या तोंडून थोडक्यात निसटला. मात्र राजकीय जाणकार अजूनही शिवसेनेबाबत आश्वस्त आहेत. अर्थात सत्तेसाठी शिवसेनेला आघाडीसोबत बऱ्याच वाटाघाटी कराव्या लागतील. राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक असली तरी काँग्रेसकडून हिरवा सिग्नल मिळालेला नाही आणि हा पेच सुटला तरच शिवसेनेला सत्तेची संधी राहिल. 
 

WEB TITLE -  SHIVSENA HAS CHANCE TO POWER SET UP IN PRESIDENT RULES 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com