#VIRALSATYA | पाहा, कशी केली हरणानं आत्महत्या...?

#VIRALSATYA | पाहा, कशी केली हरणानं आत्महत्या...?

हरणाचं पिल्लू जंगलात फिरत असताना चित्याच्या तावडीत सापडलं. चित्यासोबत ते मस्ती करत होतं. चित्याच्या तावडीत कोणताही प्राणी सापडला तर तो सुटत नाही. पण, या हरणानं काय केलं ते तुम्हीच पाहा.

हरणाचं पिल्लू जंगलात फिरत होतं...फिरत असताना हरणाची आणि पिल्लाची चुकामूक झाली आणि पिल्लू जंगलात एकटच भटकत राहिलं. फिरता फिरता हे पिल्लू चित्याच्या तावडीत सापडलं. बलाढ्य चित्ता समोर आहे म्हटल्यावर चित्ता या पिल्लाला जिवंत सोडेल कसा.? पण, चित्ता या पिल्लाला काहीही न करता पळवून लावत होता. तरीदेखील पिल्लू पळून जात नव्हतं. हे पिल्लू चित्त्याला डिवचत राहिलं. बराचवेळ झाला, उलट हे पिल्लू चित्त्यावरच दादागिरी करू लागलं. तरीदेखील हा चित्ता शांत राहिला. पिल्लाला पळवून लावत होता. कदाचित या चित्याचं पोट भरलेलं असावं.1 तास लोटला तरी हे पिल्लू चित्याशी मस्ती करत राहिलं. चित्ता वैतागला होता. या पिल्लाला काय करायचं हेच चित्त्याला कळत नव्हतं. पिल्लाला पळवूनही पिल्लू पळत नव्हतं. आता रात्र झाली होती. चित्ताही भूकेलेला होता. त्याचवेळी पुन्हा या पिल्लानं चित्याशी मस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता या चित्यानं पिल्लाचा खेळ खल्लास केला. चिडलेल्या चित्यानं हरणाच्या पिल्लाला मारून खाऊन टाकलं.
चित्ता या पिल्लाला पळवून लावत होता, पण, हरणाच्या पिल्लानं स्वत:हून आत्महत्या केली. हा सगळा प्रकार 1 तास 40 मिनिटं सुरू होता. या घटनेचा व्हिडीओ एका व्यक्तीनं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय. हा प्रकार दक्षिण अफ्रिकेच्या क्रूगर नॅशनल पार्कमध्ये पाहायला मिळालाय.

Web Title - ViralSatya Deer and tiger story

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com