पुण्या-मुंबईबाहेर महाराष्ट्र नाही?..पहा आज... फक्त साम टिव्हीवर..

 पुण्या-मुंबईबाहेर महाराष्ट्र नाही?..पहा आज... फक्त साम टिव्हीवर..
Pune Mumbai

मुंबई : महाराष्ट्र शासनानं राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळ आणि विश्वकोश मंडळाची फेररचना करताना मंडळाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक डाॅ. सदानंद मोरे यांच्याकडे दिलं आहे. त्यामुळे प्रादेशिक वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलं आहे. मंडळावरील नियुक्त्या करताना शासनाला फक्त पुणं आणि मुंबईच दिसली का, असा सवाल आता साहित्य क्षेत्रातून विचारला जाऊ लागला आहे. New Row over Appointments on Literary Board in Maharashtra

या मंडळावरील नियुक्त्यांसाठी राज्यभरातून विविध प्रांतातून नावं आली होती. पण नियुक्त्या करताना शासनानं त्याकडं दुर्लक्ष केल्याचं दिसतं आहे. तसा आक्षेपही घेतला जाऊ लागलाय. मंडळावर महिलांची संख्याही नगण्य असल्याचाही आरोप होतोय...हे खरोखरंच होतंय का....खरोखरच शासनाला पुण्या-मुंबईबाहेरचा महाराष्ट्र दिसत नाही का?  New Row over Appointments on Literary Board in Maharashtra

आज पहा....साहित्य क्षेत्रातल्या प्रादेशिक वादावर विविध साहित्यिकांनी केलेलं भाष्य...त्यांच्या प्रतिक्रिया आणि वस्तुस्थिती....

फक्त साम टिव्हीवर विविध बातमीपत्रांत......

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com