महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे कोरोनाचा शिरकाव झालाच नाही !

आनंदवाडी
आनंदवाडी

लातूर : संपूर्ण देशासह महाराष्ट्र Maharashtra कोरोनाशी Corona झगडतोय, गावागावात कोरोनाने तांडव केले आहे. मात्र लातूर Latur जिल्ह्यातील आणि कदाचित राज्यातील पहिलेच असे एक गाव, ज्या गावात Village कोरोनाचा शिरकाव झालाच नाही, ना गतवर्षी ना आज ! The Only Village In Maharashtra Where Corona Has Not Been Infiltrated!

एकीकडे सबंध राज्य, राज्यातली गावखेडी आणि देश, कोरोनाच्या महामारीत संकटाचा सामना करता आहेत. मात्र लातूर जिल्ह्यात आणि कदाचित महाराष्ट्र राज्यात एकमेव गाव असेल जिथे कोरोनाचा शिरकाव Infiltration झालाच नाही.

हे देखील पहा -

महाराष्ट्र आणि कर्नाटक Karnatak सीमेपासून Boundry  फक्त दीड किलोमीटर असणारे व लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात असलेले आंनदवाडी Anandwadi  गाव. गावच्या नावाप्रमाणेच हे गाव आजही आनंदी आहे.  कारण गेल्या वर्षभरापूर्वी कोरोनाची सुरुवात झाली. कोरोनाने देशात आणि राज्यातल्या प्रत्येक गावात हाहाकार माजवला. मात्र या गावाची शीव आजपर्यंत कोरोनाने ओलांडलीच नाही. The Only Village In Maharashtra Where Corona Has Not Been Infiltrated!

यामागचे कारण देखील तितकेच महत्वाचे आहे. कोरोनाची सुरुवात झाली आणि गावकऱ्यांनी एकच निश्चय केला, कि गावातून कोणीच बाहेर पडायचं नाही . शासनाने ठरवून दिलेले नियम पाळायचे. त्यानुसार हे गाव वागलं आणि सध्या देखील हे गाव कोरोनामुक्तच आहे. 

या गावाने सुरुवातीपासूनच कोरोनाची नियमावली काटेकोरपणे पाळली, शिवाय कर्नाटक राज्याचा संबंध देखील पूर्णपणे तोंडला. गावातला भाजीपाला, गावातला किराणा आणि वृद्धांच्या औषधांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जायला एकच व्यक्ती जाणार व ते हि पूर्णपणे सुरक्षा ठेवून हे सूत्र गावाने तयार केले.The Only Village In Maharashtra Where Corona Has Not Been Infiltrated!

त्यामुळेच आज हे गाव अजुनपण कोरोनामुक्त असल्याचे स्थानिक सांगतात. 
या गावाचा आदर्श राज्यातल्या सर्वच गावांनी आणि ग्रामस्थांनी घेतल्यास गावातून, शहरातून नव्हे तर राज्यातून कोरोना हद्दपार होण्यास मदत मिळणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com