परमबीर सिंग यांची अटक तूर्त टळली
param

परमबीर सिंग यांची अटक तूर्त टळली

मुंबई - ॲट्रॉसिटी Atrocity अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत शुक्रवारी Friday रात्री उशिरापर्यंत मुंबई उच्च न्यायालयामध्ये High Court माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग Paramvir Singh यांच्या बाबत सुनावणी सुरू होती. रात्री बारा वाजेपर्यंत ही सुनावणी झाली मात्र सोमवारी दहा वाजल्यापासून पुन्हा या सुनावणीला सुरुवात होणार असल्यामुळे परमवीर सिंग यांना मात्र हायकोर्टाने अटकेपासून दिलासा Comfort दिला आहे. Parambir Singh's arrest was averted

माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या विरोधात भीमराव घाडगे Bhimrao Ghadge यांनी 2015 मध्ये ॲट्रॉसिटी अंतर्गत तक्रार दिली होती. मात्र पाच वर्ष या प्रकरणांमध्ये काहीच पुढे आलं नाही आता या प्रकरणाबाबत सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. यात 'त्या' पत्रा नंतरच परमविर सिंह यांच्या विरोधात गुन्हे का ?असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे.

हे देखील पहा -

राज्याच्या गृह मंत्रालयवर आणि अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची भूमिका राज्य सरकारने कोर्टात मांडली. पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे आणि परमवीर सिंग यांच्यात फार पूर्वीपासून मतभेद असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली. शिवाय त्या मतभेदाचा सध्या इथं काहीच संबंध नाही पण जी तक्रार आली त्यात तथ्य असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचा खुलासा राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. या प्रकरणाच्या सुनावणी मध्ये शुक्रवारी रात्री 12 पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज चाललं.Parambir Singh's arrest was averted

साल 2015 नंतर घडलेल्या काही प्रकरणाचा तपास करताना परमवीर सिंग आणि घाडगे यांच्याशी संगणमत असल्याचे पुढे आले. मात्र घाडगे यांनी हे मान्य न करता परमवीर यांनी आपल्याला योग्य वागणूक दिली नसल्याचं शिवाय खोटे गुन्हे दाखल करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आपल्या तक्रारीत केला आहे . Parambir Singh's arrest was averted

 मात्र हे प्रकरण इतकं जुनं असताना आत्ताच हे पुढे कसं आलं? शिवाय  संजय पांडे यांनी तपासातून माघार घेण्याचे नेमकं कारण काय ? असे अनेक सवालही हायकोर्टानं विचारले आहेत. सोमवारी पुन्हा या प्रकरणाची सुनावणी सुरू होणार आहे. या वेळेस या प्रकरणातील आणखीन कुठले मुद्दे बाहेर येतील हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com