पंतप्रधान मोदींनी केली 'कोरोना वाॅरिअर्स'शी 'मन की बात'

पंतप्रधान मोदींनी केली 'कोरोना वाॅरिअर्स'शी 'मन की बात'
Narendra Modi Maan Ki Baat

नवी दिल्ली : कुणी आॅक्सिजन टँकरचा Oxygen Tanker ड्रायव्हर, कुणी महिला लोको पायलट Loco Pilot , तर कुणी आॅक्सिजनचे टँकर घेऊन उड्डाण करणारे ग्रुप कॅप्टन....पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी आज या 'कोरोना वाॅरिअर्स' शी 'मन की बात' Maan Ki Baat मध्ये संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता स्वीकारून सात वर्षे झाली. त्या निमित्तानं आज हा संवाद झाला. आजची 'मन की बात' ही ७७ वी होती.  Prime Minister Narendra Modi Had Dialogue with Corona Warrors in Maan Ki Baat

कोरोना बरोबर देशाला  नैसार्गिक आपत्तीचा सामना करावा लागला.  देश मोठ्या  ताकदीने कोरोनाशी लढतोय. ज्यांनी  या संकटाच्या काळात  देशासाठी कार्य केले त्यांना सॅल्यूट, असे सांगत मोदी यांनी विविध घटकांशी त्यांच्या अनुभवांबाबत चर्चा केली. मेडीकल  ऑक्सिजन पुरवठा देशातील कानाकोपऱ्यांत पोहचवणे   एक  मोठं  आव्हान होते हे ऑक्सिजन टँकर विविध भागात पोहोचवणारे  ड्राइवर  दिनेश उपाध्याय यांच्यीशी मोदींचा संवाद साधला. "मी  माझे  कर्तव्य करतोय. महामारीत प्राण  वाचवणे महत्वाचे ,
आम्ही जेव्हा ऑक्सिजन टँकर पोहोचवतो तेव्हा आम्हालाही आनंद होतो. टँकर पोहोचल्यावर हॉस्पिटलवाले  V म्हणजे व्हिक्टरीचे  चिन्ह दाखवतात, असं उपाध्याय यांनी सांगितलं. 

रेल्वे लोकोपायलट शिरीषा गजनी यांच्याशीही मोदींनी संवाद साधला. आॅक्सिजन एक्सप्रेसची रेल्वे विविध ठिकाणी घेऊन जाण्याचं काम शिरीषा गजनी यांनी केलं होतं.  यावेळी गजनी म्हणाल्या की मलाआई वडिलांकडून  प्रेरणा मिळाली. रेल्वेने  ऑक्सिजन एक्सप्रेस वेळेत पोहचवण्याचं काम  केल. त्यामुळं अनेक जीव वाचू शकले. Prime Minister Narendra Modi Had Dialogue with Corona Warrors in Maan Ki Baat

सिंगापूर, बेल्जियम, जर्मनी येथून आॅक्सिजन घेऊन येणारे ग्रुप कॅप्टन ए. के. पटनायक आणि त्यांच्या कन्येशीही पंतप्रधान मोंदीनी गप्पा मारल्. माझे  वडील  विदेशातून  ऑक्सिजन कंटेनर पोहचवतात,  याचा  अभिमान आहे . माझे  मित्र  मैत्रिणी याचं कौतुक करतात, असं आदिती पटनायक म्हणाली. "माझा २२ वर्षांचा अनुभव  आहे. मी व्हायरॉलॉजि  डिपार्टमेंट  मध्ये काम करतो . माझा  परिवार माझ्या  पाठीशी आहे . आम्ही प्रोटोकॉल नुसार काम करतो. त्यामुळे  कोविड टेस्टिंगच्या वेळी  आम्हाला कोणताही धोका राहत नाही, असं लॅब टेक्निशियन प्रकाश कांडपाल यांनी पंतप्रधानांना सांगितलं. Prime Minister Narendra Modi Had Dialogue with Corona Warrors in Maan Ki Baat

आम्ही ७ वर्षात   टीम इंडिया  म्हणून  काम केलंय. आमच्या सरकारच्या काळात डिजिटल पेमेंट व्यवहार वाढला. पहिल्या  करोना  लाटेत  आपण  यशस्वी झालो. आता दुसऱ्या लाटेतही ही  लढाई  आपल्याला  जिंकायची आहे. यासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. कोरोना काळातील नियम पाळा, असे आव्हानही मोदी यांनी देशातील जनतेला उद्देशून केलं.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com