नक्की वाचा | 'या' कंपनीने काढलं कोरोनावर सगळ्यात स्वस्त औषध 

 नक्की वाचा | 'या' कंपनीने काढलं कोरोनावर सगळ्यात स्वस्त औषध 

बंगळुरू : कोरोना आजारावर जगभरात देण्यात येणाºया औषधांमध्ये हे सिप्रेमी हे सर्वात स्वस्त किमतीचे औषध ठरले आहे. त्याद्वारे सिप्ला इंडियाने आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांवरही मात केली आहे.कोरोना रुग्णांवरील उपचारांत वापरण्यात येणाऱ्या रेमडिसिव्हिर औषधाची सिप्रेमी ही जेनेरिक आवृत्ती सिप्ला इंडिया या कंपनीने तयार केली आहे. या औषधाच्या १०० मिलिग्रॅमच्या कुपीची किंमत चार हजार रुपये (५३.३४ डॉलर) इतकी ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
हितेरो लॅब्ज लिमिटेड या कंपनीने रेमडिसिव्हिरच्या बनविलेल्या जेनेरिक आवृत्तीची किंमत ५४००, तर मायलॅनने बनविलेल्या जेनेरिक औषधाची किंमत ४,८०० रुपये इतकी आहे.सिप्रेमी औषधाची पहिली बॅच १० हजार कुप्यांची आहे. युरोपातील मायलॅन या कंपनीनेही रेमडिसिव्हिर औषधाची जेनेरिक आवृत्ती तयार केली असून, त्यापेक्षा सिप्लाच्या सिप्रेमी औषधाची किंमत ८०० रुपयांनी कमी आहे. 


 सिप्लासाठी हे जेनेरिक औषध बनविणारे व पॅकेजिंग करणाºया सॉव्हरिन फार्मा या कंपनीने सिप्रेमी औषधाची पहिली बॅच उत्पादित करून रवाना केली आहे. हे औषध सध्या सरकारमार्फत तसेच रुग्णालयांतूनच उपलब्ध होईल.सिप्ला इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष निखिल चोप्रा यांनी सांगितले की, सिप्रेमी हे औषध उपलब्ध करून देण्यात आले आहे. आता महिनाभरात या औषधाच्या ८० हजार कुप्या तयार करण्यात येतील. आम्ही कोरोनावर तयार करत असलेल्या जेनेरिक औषधाची किंमत ५ हजारांपेक्षा अधिक असणार नाही, असे सिप्ला इंडियाने याआधी जाहीर केले होते.
 

WebTittle :: Read exactly | The cheapest drug on corona was developed by 'Ya' company

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com