नक्की वाचा | आता 'या' नावाने बाजारात मिळणार Fair & Lovely

नक्की वाचा | आता 'या' नावाने बाजारात मिळणार Fair & Lovely

गोरे होण्यासाठी या क्रीमचा वापर करा अशी जाहिरात करत असल्याने वारंवार फेअर अॅण्ड लव्हली ब्रॅण्डवर टीका झाली होती. जाहिरातीमधून रंगभेद होत असल्याची टीकाही वारंवार झाली. अनेक सेलिब्रिटींनी याच कारणामुळे जाहिरात करण्यास नकारही दर्शवला होता. शिवाय, काही दिवसांपूर्वी अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यानंतर ‘ब्लॅक लाइव्स मॅटर’ या आंदोलनाने जोर पकडला आणि वर्णद्वेषी फेअरनेस क्रिम्स बनवणाऱ्या कंपन्याही आंदोलनकर्त्यांच्या निशाण्यावर आल्या होत्या.

पुढील काही महिन्यांमध्ये ‘ग्लो अँड लव्हली’ क्रीम रिटेल दुकानांमध्ये उपलब्ध होईल असं कंपनीकडून गुरूवारी सांगण्यात आलं. यापूर्वी २५ जून रोजी कंपनीने फेअरनेस क्रीम ‘फेअर अँड लव्हली’मधून फेअर हा शब्द वगळणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यावेळी ब्रॅण्डमधून फेअर, फेअरनेस, व्हाइट, व्हाइटनिंग, लाइट, लाइटनिंग हे शब्दही काढणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.


फेअर अँड लव्हलीची निर्मिती करणाऱ्या हिंदुस्थान युनिलिव्हरने फेअर अँड लव्हलीच्या नावात बदल करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर आता कंपनीने ‘फेअर’ शब्द हटवला आहे.प्रसिद्ध फेअरनेस क्रीम ‘फेअर अँड लव्हली’मधून अखेर फेअर हा शब्द काढण्यात आला आहे.

क्रीमच्या नावात फेअर शब्दाऐवजी ‘ग्लो’ शब्दाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे आता ‘ग्लो अँड लव्हली’ या नावाने क्रीमची विक्री होईल. हिंदुस्थान युनिलिव्हरने पुरुषांच्या क्रीमचं नावही बदललं असून यापुढे ‘ग्लो अँड हँडसम’ नावाने पुरुषांच्या क्रीमची विक्री होईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

WebTittle :: Read exactly | Fair & Lovely will be available under this name

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com