'Dream Girl' या चित्रपटातील रिंकू सिंग निकुभचे कोरोनामूळे निधन 

'Dream Girl' या चित्रपटातील रिंकू सिंग निकुभचे कोरोनामूळे निधन 
Riku Singh Nikubh

मुंबई - देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने Corona Second Wave हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेकांनी आपल्या प्रिय व्यक्तीपासून दुरावले आहेत. तसेच अनेकांना कोरोना विषाणूची Corona Virus लागण देखील झाली आहे. अनेक कलाकारांचे Artists देखील या यादीत नाव आहेत. अशाच परिस्थितीत 'ड्रीमगर्ल' 'Dream Girl' या चित्रपटातील रिकु सिंग निकुभ हिचे  Riku Singh Nikubh कोरोनामूळे निधन झाले आहे. (Riku Singh Nikubh from 'Dream Girl' dies due to corona)

 
रिंकू सिंग लहान पडद्यावरील 'चिडिया घर' या टीव्ही मालिकेतून सर्वांच्या घराघरात पोहोचली होती. तिला थिएटरचा अनुभव होता. रिंकू सिंगने प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुरानासोबत देखील काम केले आहे. चंदा सिंग ही रिंकूची चुलत बहीण आहे. तिने रिंकूच्या निधनाची बातमी वृतवाहिणीशी दिली. तिने बोलताना सांगितले की, रिंकूची 25 मे रोजी कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. तिने घरात च राहून औषधी घेतल्या होत्या. परंतु तिचा ताप कमी झालाच नाही. त्यामुळे तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा तिच्या प्रकृतीत प्रगती दिसत होती. परंतु अचानक तिची प्रकृती खराब झाली  आणि तिचे निधन झाले. 

हे देखील पहा - 

रिंकूला अस्थमाचा त्रास होता. तिने 7 मे रोजी कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. रिंकूच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यामुळेच रिंकूला देखील  कोरोना विषाणूची लागण झाली. रिंकू नेहमी आनंदी राहणारी व्यक्ती होती. अशी माहिती तिची चुलत बहीण चंदाने दिली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ryinku Singh Nikumbh (@ryinkunikumbh)

रिंकू सिंग ने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटात काम केले आहे. तिचा हॅलो चार्ली हा अमॅझॉन प्राइमवरील शेवटचा चित्रपट होता. तसेच चिडियाघर, बालवीर या टीव्ही मालिकेत देखील तिने काम केले. सिनेसृष्टीमधील अनेकांना  कोरोनाची विषाणूची लागन झाली आहे. त्यामुळे अनेकांचे  निधन देखील झाले आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता रोहीत बोहरा यांचे देखील कोरोना विषाणूमुळे निधन झालं. 

Edited by - Puja Bonkile 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com