'साम’ वर हॅपी बर्थडे सचिन - स. १० व रात्री ११ वाजता

'साम’ वर हॅपी बर्थडे सचिन - स. १० व रात्री ११ वाजता
Sachin Tendulkar

चिन तेंडुलकरचा २४ एप्रिलला वाढदिवस आहे. लाडक्या क्रिकेटपटूचा वाढदिवस असल्याने त्याचे चाहते आनंदात असतात. देशात कोरोना संकटाने उग्र रूप धारण केल्याने यंदाचे वर्ष कोणाचाही वाढदिवस साजरा करण्याचे नक्कीच नाही. पण तरी चांगुलपणाची आठवण काढू नये, असेही नाही. Saam TV to telecast special program on Sachin Tendulkar Birthday

सचिन तेंडुलकरच्या Sachin Tendulkar कारकिर्दीत अनेक चढउतार येऊन गेले. यशापयशाबरोबरीने सचिनने सुख - दु:खाचे दशावतार अनुभवले. सचिनच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्याचा विचार केला तर त्याला अनुसरून काही गाणी आठवतात. ते टप्पे आणि त्यावर आठवणारी गाणी यांचा संगम हा क्रिकेट Cricket रसिकांसाठी मनोरंजन Entetainment आणि सध्याच्या निराशेच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा देणारा ठरावा, या उद्देशाने नामवंत कलाकार एकत्र आले आहेत. प्रत्येक कलाकाराने सचिनच्या २४ वर्षांच्या कारकिर्दीतील मोजक्या टप्प्यावर एक गाणे सादर करीत त्यावर भाष्य केले आहे.

या खास प्रयत्नात आनंद भाटे, सलील कुलकर्णी, स्वानंद किरकिरे Swanand Kirkire, रश्मी मोघे, प्रशांत नासेरी यांनी गाणी सादर केली आहेत. सचिन जांभेकर याने एक खास गाणे हार्मोनियमवर पेश केले आहे. त्या बरोबरीने हर्षा भोगले, विक्रम साठ्ये आणि हृषिकेश जोशी यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. कवी वैभव जोशीने सचिन तेंडुलकरचे वर्णन करणारा आगळा अभंग रचला आहे. सध्याच्या निराशेच्या वातावरणात मनाला आनंद आणि उभारी देणारा हा खास कार्यक्रम सचिनच्या वाढदिनी म्हणजेच शनिवारी (ता.२४) सकाळी ११ आणि रात्री ११ वाजता ‘साम’ टीव्ही Saam TV वाहिनीवरून सादर केला जाणार आहे. Saam TV to telecast special program on Sachin Tendulkar Birthday

सामाजिक संस्थांना मदतीचा हात
गाजावाजाने वाढदिवस साजरा न करता सचिन आणि सकाळ फाउंडेशन एकत्र येऊन चांगले काम करणाऱ्या निवडक तीन सामाजिक संस्थांना मदतीचा हात देणार आहेत.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com