जोरदार चर्चा ! आईला गिफ्ट केलं छप्पर नसलेलं घर 

जोरदार चर्चा ! आईला गिफ्ट केलं छप्पर नसलेलं घर 
Son gifted his mother a house without a roof

सिंधुदुर्ग: तळकोकणात Kokan पारंपारिक पद्धत पद्धतीने घर उभारली जातात. पण सध्या कोकणात एका घराची चर्चा जोरदार रंगू लागली आहे. ते म्हणजे  "न्युझीलंड" घर .. हे घर मुलांनी आपल्या आईला गिफ्ट दिलं आहे.. काय आहे हे घर..? आणि हे कोणाचे घर आहे.. ? Son gifted his mother a house without a roof

सिंधुदुर्गातल्या कणकवली तालुक्यातील करंजे गावांमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारे आणि आकर्षक दिसणारे "न्युझीलंड" घर सर्वांचं चर्चा विषय बनला आहे. वाकडे-तिकडे- त्रिकोणी अशा आकाराचा आहे खर आहे. अशी घरे न्यूझीलंडमध्ये पाहायला मिळतात. 

प्रसाद सावंत यांचं अनेक वर्षापासूनच स्वप्न होतं माझ्या आईला, घराला छप्पर नसेल आणि तस कोकणातही घर नसेल असं वेगळं घर बांधून गिफ्ट द्यायची  इच्छा होती. 

प्रसाद सावंत यांनी सांगितले कि, इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या घरांची कलाकृती शोधायला मी सुरुवात केली. एक अनोखं गिफ्ट माझ्या आईला द्यायचं होतं, इंटरनेटवर सर्च करता करता अशी घरं मला न्यूझीलंडमध्ये सापडली. मुख्यता घराची भिंत कशी असावी कारण आरसीसी बांधकाम शक्य नव्हतं. घराला लागणारे मटेरियल हे कुठून आणायचं याबाबत मात्र संभ्रम होता, मी माझ्या कॉन्ट्रॅक्टर आणि आर्किटेक यांच्याशी चर्चा करून विशिष्ट प्रकारच्या फायबर मिश्रित पासून घर बनवलं. 

यापुढे ते म्हणाले, आमचं लहानपण अगदी गरिबीत गेली. आम्ही नोकरीला लागल्यानंतर गरिबीची झळ तिच्या उरलेल्या आयुष्याला लागू नये यासाठी माझ्या आईला गिफ्ट द्याव म्हणून त्यातून संकल्पना सुचली .

"छपर नसलेलं घर तिला गिप्ट द्याव" ही युनिक संकल्पना मनात आली आणि मी साकारण्याची प्रयत्न केला. परंतु त्याच्यामध्ये घर बांधत असताना अनेक अडचणी आल्या. एक मात्र सांगू इच्छितो की, माझ्या आईसाठी हे सर्व मी केलं. परंतु आई सहा महिने या वास्तूमध्ये राहिली आणि इथेच आपला प्राण गमावला.. तिची मला राहून राहून सारखी आठवण येते आहे. 

 हे देखील पहा -

अगदी गरिबीमध्ये आपल्या मुलांना या आईने लहानाचं मोठं केलं. ती मुलं नोकरीला लागून मुलांनी एक युनिक गिफ्ट दिल.  ते अनोखं गिफ्ट आईने घेतलं आणि आयुष्याचा आपला प्रवास अर्धवट सोडला.

Edited By-Sanika Gade
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com