ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या खात्याला पुन्हा दिली ब्लू टिक !

ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या खात्याला पुन्हा दिली ब्लू टिक !
venkaih naidu

नवी दिल्ली : ट्विटरने Twitter भारताचे उपराष्ट्रपती Vice President of India
एम.व्यंकय्या नायडू M.Venkaiah Naidu यांचे ट्विटर अकाऊंट अनवेरिफाइड करत वैयक्तिक ट्विटर हँडलवरून ब्लू टिक हटविला होता. Twitter Removes Blue Tick From Account Of Vice President Venkaiah Naidu 

मात्र सर्वच स्तरातून ट्विटर वर टीका होऊ लागल्याने ट्विटरने स्पष्टीकरण देत अकाऊंट अनवेरिफाइड करण्याचे कारण सांगितले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या या ट्विटर अकाऊंटवरून गेल्या 11 महिन्यांपासून कोणतेही ट्विट केलेले नाही. या अकाऊंटवरून बऱ्याच दिवस लॉगिन करण्यात आले नाही. तसेच अखेरचे ट्विट दिनांक 23 जुलै 2020 रोजी केले गेले होते.

हे देखील पहा -

अशा परिस्थितीमध्ये ट्विटरवर ब्लु टिक Blue Tick काढते. ट्विटरच्या अटींनुसार, जर कोणी त्यांच्या हँडलचे नाव बदलले (@ हँडल) किंवा वापरकर्त्याने त्याचे अकाऊंट ज्या पद्धतीने वेरिफाई केले त्या पद्धतीने वापरले नाही तर या प्रकरणात निळा टिक म्हणजे Blue Verified Badge काढून टाकते. 

मात्र आता ट्विटरने झालेली चूक सुधारत अकाउंटला पुन्हा ब्लु टिक सुरु केला आहे असे स्पष्टीकरण ट्विटरच्या प्रवक्त्यांमार्फत देण्यात आले आहे.Twitter Removes Blue Tick From Account Of Vice President Venkaiah Naidu 

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com