VIDEO |  10 रुपयांचे नाणे बंद होणार ?

VIDEO | 10 रुपयांचे नाणे बंद होणार ?


10 रुपयांचं नाणं बंद होणार अशी अफवा पसरली आणि त्यामुळेच आता 10 रुपयांचं नाणं कुणीच घेत नाहीये...दुकानदार, व्यापाऱ्यांना 10 रुपयांचं नाणं दिलं तर स्वीकारत नाहीयेत...पण, खरंच 10 रुपयांचं नाणं बंद होणार आहे का...? याची आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला...दहा रुपयांचं नाणं कुणीही घ्यायला तयार नाहीये...एकवेळ 10 ची फाटलेली नोट चालेल पण, नाणं नको असंही काही व्यापारी सांगतात...त्यामुळं 10 रुपयांच्या नाण्याबद्दल संभ्रम निर्माण झालाय...बँकेतही नाणं घेत नसल्याचा आरोप करण्यात आलाय...
नाण्यावर कोणतीही बंदी आली नसून हे नाणे चलनात कायम आहे...मात्र, ग्राहक, व्यापारी हे नाणे घेत नसल्याने सद्या जिल्ह्यात वेगळीच समस्या निर्माण झालीय...दहाचे नाणे इतक्या प्रमाणात जमा झालंय की एसबीआईची तिजोरी पूर्णपणे भरल्याचं अधिकारी सांगतायत...

ही नाणी बँकेत मोठ्या प्रमाणात जमा झालीयत...त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बँकात इतर चलनी नोटा ठेवण्यास जागेची अडचण येतेय...हा संभ्रम निर्माण झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्रक जारी केलंय...व्यापाऱ्यांनी चिल्लर स्वीकारावी, तसेच नागरिकांनीसुध्दा अपप्रचाराला बळी पडू नये...असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय...त्यामुळं आमच्या पडताळणीत 10 रुपयाचे नाणे बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरला...
 

WebTittle :: VIDEO | 10 rupee coin to be closed?


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com