VIDEO | नजर घालवणाऱ्या चॅलेंजपासून सावधान !

VIDEO |  नजर घालवणाऱ्या चॅलेंजपासून सावधान !

टिकटॉकवर तुम्ही जर आईज चॅलेंज स्वीकारत असाल तर सावध व्हा.कारण, नको ते चॅलेंज स्वीकारून तुम्ही नजर कमी करतायत.सोशल मीडियावरून कोणतंही चॅलेंज आलं की झपाट्याने व्हायरल होतं...पण, प्रसिद्धीसाठी धोकादायक चॅलेंज जीवावरही बेतू शकतात...या डेंजर चॅलेंजमुळे युझर्स आपल्या डोळ्यांशी खेळ खेळतायत...यामुळं डोळ्यांची दृष्टी जाऊन कायमचं आंधळेपण येऊ शकतं...


या चॅलेंजमध्ये युझर्स आपल्या डोळ्यांच्या बाहुलीवर मोबाईल फोनचा फ्लॅश मारून व्हिडिओ रेकॉर्ड करतात...टिकटॉकच्या S5 फिल्टरचा वापर करून डोळ्यांचा रंग बदलतो असाही दावा करण्यात आलाय...पण, डोळ्यांचा रंग बदलण्यासाठी घातक चॅलेंज किती धोकादायक ठरू शकतं...याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आमची व्हायरल सत्य टीमनं आईज स्पेशालिस्टला भेटली...त्यांना या चॅलेंजबद्दल सांगितलं आणि हे चॅलेंज डोळ्यांवर किती परिणामकारक ठरू शकतं याबद्दल जाणून घेतलं...हे चॅलेंज डोळ्यांसाठी घातक असल्याचं स्पष्ट झालं...त्यामुळं असं चॅलेंज स्वीकारताना काय काळजी घ्यायला हवी हेदेखील जाणून घेतलं...

चॅलेंजमुळे डोळ्यांवर दुष्परिणाम !


थेट डोळ्यावर कोणताही तीव्र लाईट धोक्याचा आहे

तीव्र प्रकाशाने डोळे कोरडे पडण्याची शक्यता आहे

डोळे लाल होणे, खाज येणे आणि अंधुक दिसणे हे प्रकार होऊ शकतात

फ्लॅश लाईटमुळे नजर अंधुक होते आणि वयोमानानुसार डोळेही निकामी होऊ शकतात

अचानक तीव्र लाईट डोळ्यावर आल्यावर डोळ्यांची बाहुली बारीक होत असते


हा ट्रेंड एक टिकटॉक युझर मालियाब्रूपासून सुरू झाला...कुणाचे डोळे ब्राऊन असतील तर टिकटॉकचे S5 फिल्टरमुळे त्याचे डोळे ब्लू दिसतील असा दावा केला...इतकंच नव्हे तर चॅलेंज करून दाखवलं...त्यानंतर हे चॅलेंज वेगाने व्हायरल झालं...पण, या चॅलेंजमुळं कायमचे आंधळेपण येऊ शकतं...त्यामुळं तुम्ही असं खतरनाक चॅलेंज स्वीकारू नका...

WEBTittle :: VIDEO | Beware of a challenging challenge!

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com