VIDEO | 10 वर्षाच्या मुलावर वळूचा जीवघेणा हल्ला

VIDEO | 10 वर्षाच्या मुलावर वळूचा जीवघेणा हल्ला

...दोन वळू मोकाट फिरत होते...येणाऱ्या जाणाऱ्यांवर हल्ला करत होते... अचानक दोन वळू वस्तीत आले आणि सुरू झाला हल्ल्याचा थरार... या व्हिडीओत बघा...बिचारा 10 वर्षांचा हा मुलगा रस्त्यानं चालला होता...त्याचवेळी मागून आलेल्या वळूनं जोरात धडक दिली...वळूच्या धडकेनं हा मुलगा खाली पडला... वळू शिंगाने या मुलावर हल्ला करतोय... बिचारा मुलगा आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय...पण, दोन वळू समोर असल्याने याला पळणं शक्य नव्हतं... 
वळूंना पळवून लावण्याचा प्रयत्न केला...पण, वळू ऐकत नव्हते... दोन ते तीन मुलं वळूंना काठीनं मारत होते...तरीदेखील वळू या मुलावर हल्ला करत राहिला..जोरजोरात काठीनं वळूला मारल्यामुळं वळू पळून गेला.. यांनाही वाटलं वळू पळून जाईल पण, पुन्हा वळू आला.. या मुलाला उचलून नेईपर्यंत पुन्हा वळूनं हल्ला केला.. या हल्ल्यात मुलाला गंभीर जखम झाली...त्याला उठायलाही जमत नव्हतं,एवढा हल्ला या वळूनं केला...

अखेर लोकांनी या वळूंना काठीनं मारून मारून हाकलून दिलं... आणि या वळूच्या तावडीतून मुलाची सुटका केली..बघा, किती भयानक प्रकार घडलाय... हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशच्या झाशीमधील उन्नाव गेट परिसरात घडलाय...तिथल्या लोकांनी या जखमी झालेल्या मुलाला उचलून हॉस्पिटलमध्ये नेलंय...त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर आहे...या वळूंच्या दहशतीमुळं उन्नाव गेट परिसरात फिरायचीही लोकांची हिंमत होत नाहीये...आता हा व्हिडीओ व्हायरल होत असून, मोकाट वळूंपासून सावध राहा...


WebTittle ::  VIDEO | Fatal attack on a 10-year-old boy

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com