Viral | A रक्तगट असणाऱ्यांना कोरोनाचा अधिक धोका ?

Viral | A रक्तगट असणाऱ्यांना कोरोनाचा अधिक धोका ?
viral satya A blood group riski corona virus

सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत असल्याने लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय.A रक्तगटातील व्यक्तींना अधिक धोका असल्याचा दावा केलाय.तर O रक्तगटातील लोकांना इतर रक्तगटातील व्यक्तींपेक्षा धोका कमी असाही दावा केलाय. व्हायरल मेसेजमधील दावा कितपत खरा आहे ? याची आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.पण, व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केला वाचा सविस्तर.

  • काय आहे व्हायरल मेसेज ?
  • A ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाचं प्रमाण अधिक आणि तीव्र अशी लक्षणं दिसून आलीत.तर O रक्तगट असलेल्या व्यक्तींना इतर रक्तगटाच्या तुलनेत कोरोना व्हायरसचा धोका कमी आहे

हा मेसेज व्हायरल होत असल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण झालीय.ज्यांचा A रक्तगट आहे त्यांना धास्ती वाटू लागलीय.त्यामुळं या व्हायरल मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली.याबद्दल अधिक माहिती डॉक्टर देऊ शकतात.आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे हे डॉक्टरांना भेटले आणि त्यांच्याकडून या रक्तगटांबद्दल माहिती जाणून घेतली.

या व्हायरल मेसेजमध्ये तथ्य नसल्याचं समोर आलं.अनेक आजारांशी रक्तगटाशी संबंध असतो हे खरं आहे.पण, A रक्त गटाला धोका आणि O रक्तगटाला धोका नाही हे अजून सिद्ध झालेलं नाही- डॉ. अजय दंडे, तज्ज्ञ

त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं वाचा सविस्तर.

  • काय आहे व्हायरल सत्य ?
  • A रक्तगट असेल तर कोरोनाचा धोका हा दावा खोटा 
  • O रक्तगट किंवा कोणताही रक्तगट असेल तरी संसर्गातून कोरोनाचा धोका निर्माण होतो
  • सर्व रक्त गटाच्या लोकांनी कोरोनापासून सारखीच काळजी घ्यायचीय
     

कोरोनामुळे कोणीही काहीही मेसेज व्हायरल करतोय.जरी O रक्तगट असला तरी तुम्ही कोरोना व्हायरसपासून पूर्णपणे सुरक्षित आहात असा नाही.काळजी घ्या आणि कोरोना व्हायरसपासून स्वत:चा बचाव करा.आमच्या पडताळणीत A रक्तगटाला अधिक धोका असतो हा दावा असत्य ठरला.

Web title : viral satya A blood group riski corona virus

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com