Viral | कोरोना व्हायरस संशयितांना पकडायला बंदुकीचा धाक ?

viral satya china clamping down suspect of coronavirus
viral satya china clamping down suspect of coronavirus

कोरोना व्हायरस संशयितांना बंदुकीचा धाक दाखवून चीनमध्ये पकडलं जातंय असा दावा केला जातोय. व्हिडीओत पोलिस काही लोकांना बंदुकीचा धाक दाखवून पकडत असल्याचं दिसतंय.पण, चीनमध्ये अशा प्रकारे पोलिस कोरोना संशयितांना पकडतायत का ? एवढी क्रूर वागणूक कोरोना संशयितांना दिली जातेय का ? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.पण, व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय वाचा सविस्तर.

  • काय आहे व्हायरल मेसेज ?
  • क्वॉरंटटाइन करण्यासाठी पळून जाणाऱ्या कोरोना व्हायरस संशयितांना पोलिस पकडतायत.संशयितांना पकडण्यासाठी चीनच्या पोलिसांना मोठी कसरत करावी लागतेय

हा मेसेज आणि पुरावा म्हणून व्हिडीओ व्हायरल केला जातोय.कोरोना संशयितांनाच चीनमध्ये पकडलं जातंय असे मेसेज व्हायरल केले जातायत.चीनमध्ये कोरोनाचे पेशंट अधिक असल्याने लोक यावर विश्वास ठेवतायत.पण, खरंच हा व्हिडीओ कोरोना व्हायरस संशयितांना पकडतानाचा आहे का ? अनेकजण कोरोनाच्या नावाने अफवा पसरवतायत.लोकांच्या मनात भीती निर्माण करतायत.त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्याचा आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली.कोरोना व्हायरसबद्दल अनेकजण खिल्ली उडवताय.सोशल मीडियावर व्हिडीओ तयार करतायत.पण, आम्ही या व्हिडीओची सत्यता जाणून घेतली.पडताळणी करत असताना हा व्हिडीओ जुना असल्याचं समोर आलं.त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं वाचा सविस्तर.

  • काय आहे व्हायरल सत्य ?
  • व्हायरल व्हिडीओ कोरोना संशयितांना पकडतानाचा नाही
  • या व्हिडीओचा कोरोना व्हायरसशी काहीही संबंध नाही
  • 1 सप्टेंबर 2019 चा हा व्हायरल व्हिडीओ शूट करण्यात आलाय
  • हाँगकाँगमध्ये झालेल्या आंदोलनाचा व्हिडीओ आहे
  • हिंसाचार वाढल्यानंतर हाँगकाँग पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला होता

हाँगकाँगमध्ये झालेल्या आंदोलनाचा व्हिडीओ कोरोनाच्या नावाने व्हायरल केला जातोय.पण, या व्हिडीओचा कोरोनाशी काहीही संबंध नाही.असे कोणतेही व्हिडीओ व्हायरल करू नका.आमच्या पडताळणीत कोरोना संशयितांना बंदुकीचा धाक दाखवून पकडत असल्याचा दावा असत्य ठरला.

web title : viral satya china clamping down suspect of coronavirus

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com