Viral | डायनासोर बनून लोक का फिरतायत रस्त्यावर ?

Viral | डायनासोर बनून लोक का फिरतायत रस्त्यावर ?
viral satya costumes dinosaur while lockdown from coronavirus

कोरोनामुळे काही देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलंय.त्यामुळं सगळंच बंद असल्याने कुणीही घराबाहेर पडत नाहीये.पण, असे काही व्हिडीओ आता व्हायरल होतोयत.चक्क रस्त्यावर एक डायनासोर फिरत असल्याचं पाहायला मिळालं.असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतायत.डायनासोर दिसत असलेला ड्रेस घालून लोक प्राण्यांना बाहेर फिरवत असल्याचं दिसतंय.कुणी बाहेर फिरू नये, गर्दी करू नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आलंय.

हे सगळे प्रकार युरोपमध्ये पाहायला मिळतायत.या व्हिडीओत डायनासोरसारखा ड्रेस घातलेली व्यक्ती रस्त्यावर फिरत होती.त्यावेळी पोलिसांनी याला पकडलं, आणि घरी जायला सांगितलं.त्यामुळं लोकांना बाहेर पडणं मुश्कील झालंय.पण, घराबाहेर कचरा टाकण्यासाठी लोक असे युक्त्या करू लागलेयत.एका व्हिडीओत व्यक्तीने डायनासोरसारखा ड्रेस घालून कचराकुंडीत कचरा टाकण्यासाठी आलीय.कुणी पाळीव प्राण्यांना बाहेर फिरवण्यासाठी अशा युक्त्या करत असल्याने अनेक व्हिडीओ आता व्हायरल होतायत.

पण,लॉकडाऊन केल्याने अशा प्रकारे बाहेर फिरणं योग्य नाही.सरकारने दिलेल्या आदेशाचं पालन करणं गरजेचं आहे.

web title :  viral satya costumes dinosaur while lockdown from coronavirus

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com