VIDEO | मोदी सरकार काढणार नवं ब्रह्मास्त्र?

VIDEO | मोदी सरकार काढणार नवं ब्रह्मास्त्र?

तिहेरी तलाक, कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न संसदीय मार्गानं सोडवल्यानंतर केंद्रातलं भाजप सरकार लवकरच आपल्या भात्यातलं खास शस्त्र बाहेर काढण्याच्या चर्चा आहेत..समान नागरी कायदा हा विषय भाजपच्या अजेंड्यावर कायमच राहिलाय..कायम समान नागरी कायद्याचा पुरस्कार करणाऱा भाजप संसदेत त्यासाठीचं विधेयक आणण्याच्या चर्चा त्यामुळे आता सुरू झाल्यात..


देशातल्या प्रत्येक नागरिकाला जात-धर्माच्या पलीकडे जाऊन एकच कायदा म्हणजेच समान नागरी कायदा..त्यामुळे विवाह, घटस्फोट, वारसाहक्कानं मिळणारी संपत्ती अशा सर्वच बाबतीत प्रत्येक जात-धर्मासाठी समान कायदा लागू होईल..इतकंच नाही तर वडिलांच्या संपत्तीवर अधिकार आणि दत्तक विधान या बाबतीतही सर्वांना एकच कायदा लागू होईल..

.प्रत्येक  धर्माचे वेगवेगळे कायदे असल्यानं त्यासंबंधीचे खटले कोर्टांमध्ये प्रलंबित राहतात, त्यांचं प्रमाणही कमी होईल, असा युक्तिवाद या कायद्याचं समर्थन करणारे करतायत..इतकंच नाही तर कोणत्याही धर्माच्या परंपरांवर घाला घातला जाणार नाही, मात्र, विविधतेने नटलेल्या भारतासारख्या देशात असा कायदा लागू करणं म्हणजे पुन्हा एकदा नव्या वादाला जन्म देण्यासारखंच आहे..

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com