VIDEO | ठाणे, कल्याणमधील महिलांची नोकरीला सुट्टी

VIDEO | ठाणे, कल्याणमधील महिलांची नोकरीला सुट्टी

ठाण्यात राहणाऱ्या मुकुल अंधेरीत ट्रॅव्हल कन्सल्टंट म्हणून कार्यरत होत्या. पण लोकलची असह्य गर्दी आणि त्यातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी नोकरीला रामराम ठोकलाय...मुकुल मुजमदार हे केवळ प्रातनिधीक उदाहरण आहे. त्यांच्यासारख्या कितीतरी महिला रोजच्या या जीवघेण्या प्रवासाला वैतगल्या आहेत. 

नोकरीच्या निमित्तानं शेकडो महिला दररोज रेल्वेनं प्रवास करतात. 12 डब्ब्यांच्या लोकलला इनमिन तीन महिला डबे..या डब्यात प्रवेश मिळवायचा म्हणजे अग्निदिव्यच...नोकरी, प्रवास आणि संसार या तीन गोष्टींची सांगड घालता घालता महिला वर्गाची जी अवस्था होतीय ती शब्दात सांगता येणं कठीण आहे. अशा वेळी नाईलाजास्तव का होईना महिलांना हक्काच्या नोकरीवर पाणी सोडावं लागतंय. 


मुकुल यांच्या सारख्या अनेक महिला आज नोकरी सोडण्याच्या विचारात आहेत. रेल्वे प्रशासन आणि सरकारनं याचा गांभीर्यानं विचार करायला हवा. आता कुठे महिला वर्षानुवर्ष चालत आलेल्या रूढी परंपराचे पाश झुगारून मोकळा श्वास घेऊ लागल्या आहेत. त्यात आता जीवघेण्या प्रवासापायी त्यांच्यावर पुन्हा घराच्या चार भिंतीत राहण्याची वेळ आली तर पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही सर्वात दुर्दैवी बाब असेल. 

WebTittle :: Women Vacation in Thane, Kalyan


 


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com