पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत अभिजित बिचुकलेंची एन्ट्री ...

भारत नागणे
मंगळवार, 30 मार्च 2021

पोटनिवडणुकीच्या राजकारणाच्या सामन्यात मराठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी आपला अर्ज दाखल केला आहे.  राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूरच्या पोटनिवडणुकीसाठी भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे राष्ट्रवादीकडून तर समाधान अवताडे हे भाजपकडून निवडणूक लढविणार आहेत.

पंढरपूर : राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूरच्या पोटनिवडणुकीसाठी भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे राष्ट्रवादीकडून तर समाधान अवताडे हे भाजपकडून निवडणूक लढविणार आहेत.

या पोटनिवडणुकीच्या राजकारणाच्या मराठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे. मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न त्याचप्रमाणे विठू माऊलीच्या नगरीत नेत्यांनी केलेली दूरअवस्था बघवत नसल्याचे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आण्यासाठी मला ही पोटनिवडणूक लढवायची आहे. असा दावा बिचुकलेनी केला आहे. त्याच प्रमाणे ही पोटनिवडणूक जिंकणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

बिचुकले यांनी लोकसभा निवडणुकीत खाजदार उदयनराजेंविरोधात तर विधानसभेला युवासेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.या दोन्ही वेळी त्यांचे डिपाॅझिट जप्त झाले होते.

Edited By-Digambar Jadhav  


संबंधित बातम्या

Saam TV Live