VIDEO | प्लास्टिकच्या विक्रिसाठी पंतप्रधांनाच्या फोटोचा गैरवापर

प्रसाद नायगावकर साम टीव्ही यवतमाळ
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

 

 
 पर्यावरण संवर्धनासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं मोहिम हाती घेतलीय. प्लास्टिक बंदी हा त्याचाच एक भाग आहे. प्रदुषण टाळण्यासाठी 50 मायक्रॉनच्या आतील प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी आहे. असं असताना यवतमाळ जिल्ह्यातमात्र प्लास्टिकचा सर्रासपणे वापर सुरूंय. बरं या प्लास्टिकवर कारवाई होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांनी एक नवी शक्कल लढवलीय. इथं चक्क प्लास्टिकच्या पन्नीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच फोटो छापण्यात आलाय. केवळ मोदींचाच फोटो नाही तर त्यावर भाजपचं निवडणूक चिन्ह, स्वच्छ भारत मिशनचा लोगोही आहे. यावर कळस म्हणजे या प्लास्टिकच्या वेष्टनांवर 51 मायक्रॉनची नोंद करून सरळ सरळ लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यात आलीय. 

 

 विशेष म्हणजे या प्लास्टिक पिशव्यांचं उप्तादन गुजरातमध्ये होतंय. नाशिकमार्गे या प्लास्टिक उप्तदनांचा राज्यभरात पुरवठा केला जातो. प्रशासनानं मात्र या सगळ्या प्रकाराकडे कानाडोळा केलाय. त्यामुळे या अवैध धंद्यांना प्रशासनाचं पाठबळ तर नाही ना, असा सवालही यानिमित्तानं उपस्थित होऊ लागलाय. 

 

WebTittle :: Abuse of PM's photo for sale of plastic


 

 

 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live