चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने मिरजेवाडी घाटात भीषण अपघात !

रोहिदास गाडगे
सोमवार, 26 एप्रिल 2021

खेड तालुक्यातील मिरजेवाडी घाटातुन चासकडे जनावरांचा चारा वाहतुकीसाठी जात असताना ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने भिषण अपघातची घटना घडली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत

राजगुरुनगर: खेड Khed तालुक्यातील मिरजेवाडी Mirjewadi घाटातुन चासकडे Chaas जनावरांचा चारा वाहतुकीसाठी जात असताना ट्रॅक्टर Tractor चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने भीषण अपघातची घटना घडली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. Accident in Mirjewadi Ghat driver lost control of tractor

अपघातादरम्यान जखमी झालेल्या व्यक्तींला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची खबर कळताच राजगुरुनगर Rajgurunagar पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघाताच्या घटनेत मृत्यु झालेल्या व्यक्तिचे नाव मच्छिंद्र शिवाजी गावडे (३०) असे आहे. 

मंचर येथुन चास येथे जनावरांसाठी चारा Fodder for animals आणण्यासाठी ट्रॅक्टरमधुन जात असताना मिरजेवाडी घाटात अचानक ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यु झाला. Accident in Mirjewadi Ghat driver lost control of tractor

उत्तर पुणे जिल्ह्यात जनावरांच्या चा-यांची भिषण टंचाई आहे.  त्यामुळे पाळीव जनावरांना चारा मिळविण्यासाठी शेतकरी गावागावांत भटकंती करत असतात. जनावरांसाठी उपलब्ध होईल तसा चारा गावागावांतुन वाहतुक करुन साठवणुक केला जातो. तसेच हा साठा ट्रॅक्टरच्या क्षमतेपेक्षा सुद्धा जास्त वाहून आणला जातो.  त्यामुळे याच दरम्यान अशा अपघाताच्या घटना घडत आहे.

Edited by-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live