मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर रायगड जिल्ह्यातील रासायनीजवळ स्विफ्ट डिझायर कार आणि गॅस टँकरचा भीषण अपघात झाला आहे. त्यात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.
 

लोणावळा: मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर रायगड जिल्ह्यातील रसायनीजवळ स्विफ्ट डिझायर कार आणि गॅस टँकरचा भीषण अपघात झाला आहे. त्यात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.

हा अपघात नेमका कशामुळं झाला हे कळू शकलेलं नाही. अपघातग्रस्त स्विफ्ट डिझायर कार (एमएच ११ सीएच १८८९) सजविण्यात आली होती. त्यामुळं ही कार एखाद्या लग्न सोहळ्यासाठी चालली असावी, असा अंदाज आहे. भरधाव असलेल्या या कारनं मागच्या बाजूनं टँकरला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अर्ध्या कारचा अक्षरश: चुराडा झाला. त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी आहेत. स्थानिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title four dead in accident on mumbai pune express highway near rasayani
 


संबंधित बातम्या

Saam TV Live