गतिरोधकामुळे अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यु

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पुणे : पुण्यात गतिरोधकामुळे दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यु झाला. ही घटना सोमवारी सकाळी साडे पाच वाजता मार्केट यार्ड येथील वखार महामंडळ चौकात घडली. हमीद मुर्तुजा हुसेन (वय 34, रा. अश्रफनगर, कोंढवा, मूळ रा. उत्तरप्रदेश) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मार्केट यार्ड येथील वखार महामंडळ चौकातील गतिरोधकाचा अंदाज दुचाकीस्वारास न आल्याने भरधाव दुचाकी एक ते दिड फुट उंच उडुन दुभाजकाला धडकली. त्यानंतर दुचाकी घासत पुढे गेली. त्यावेळी दुचाकीस्वार रस्त्यावर पडुन जबर जखमी झाल्याने त्याचा मृत्यु झाला.

Web Title: Accidental Death of Two Wheeler rider due to speed breaker

संबंधित बातम्या

Saam TV Live