दीपिकाची तब्बल साडे पाच तास चौकशी, चौकशीत समाधानकारक उत्तरं नसल्याचं NCBचं म्हणणं

साम टीव्ही
शनिवार, 26 सप्टेंबर 2020
  • ड्रग्ज प्रकरणी दीपिकाची चौकशी संपली
  • 'होय, मी ग्रुप ऍडमिन होते'
  • केवळ चॅट केलं, ड्रग्ज सेवन केलं नाही'
  • NCBच्या चौकशीत दीपिकाची कबुली

दीपिका पादुकोणची ड्रग्ज प्रकरणाची चौकशी संपली. पण, चौकशीत दीपिकाकडून समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याची माहिती NCB च्या सूत्रांनी दिलीय. मात्र, ग्रुप ऍडमिन असल्याची दीपिकानं कबुली दिलीय. केवळ चॅट केलं, पण, ड्रग्ज सेवन केलं नाही' अशी कबुलीही दीपिकानं NCBच्या चौकशीत दिलीय.

दरम्यान, NCBच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येतायेत, सुशांतसिंह राजपूत ड्रग्ज घ्यायचा, असा खळबळजनक आरोप सारा अली खान आणि श्रद्धा कपूरनं केला. तर सुशांतसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची माहिती सारानं दिलीय. केदारनाथच्या शूटिंगवेळी आम्ही रिलेशनशीपमध्ये  होतो असं सारानं सांगितलंय. तर छिछोरेच्या प्रदर्शनानंतर पवना इथं ड्रग्ज पार्टी झाली. मात्र आम्ही कधीच ड्रग्जचं सेवन केलं नाही अशी माहिती श्रद्धा कपूरनं दिलीय. NCBच्या चौकशीत या दोन्ही अभिनेत्रींनी ड्रग्जचं खापर सुशांतवर फोडलंय. दरम्यान चौकशीवेळी श्रद्धा कपूर प्रचंड चिंताग्रस्त असल्याचंही पाहायला मिळालं. 

या प्रकरणातील सर्व व्हिडिओ अपडेट्स -

ड्रग्ज प्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर येतेय. दिग्दर्शक करण जोहरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. क्षितीजच्या अटकेनंतर 4 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेय. धर्मा प्रोडक्शनच्या क्षितीजला आज अटक करण्यात आलेय. यानंतर आता NCB कडून 4 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेय. क्षीतिज हा धर्मा प्रोडक्शन आधी शाहरुखच्या रेड चिलीमध्ये असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता करण जोहरच्या अडचणीत वाढ झालेली असतानाच आणखी काही नावं चौकशीदरम्यान समोर येते का पाहायला हवं.


संबंधित बातम्या

Saam TV Live