'धक्कादायक' इस्लामपुरात रस्त्यावर विनाकारण फिरणारे तब्बल ८ जण कोरोना पॉझिटिव्ह..

विजय पाटील
सोमवार, 26 एप्रिल 2021

सांगलीच्या इस्लामपूर शहरात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर सुरू असलेल्या रॅपिड अँटिजेन तपासणीच्या कारवाईत आज सकाळी शिराळा नाका परिसरात तब्बल ८ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे

सांगली : सांगलीच्या Sangli इस्लामपूर Islampur शहरात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर सुरू असलेल्या रॅपिड अँटिजेन तपासणीच्या कारवाईत शिराळा Shirala नाका परिसरात तब्बल ८ कोरोना Corona पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. तर याच कारवाईत काल ३ जण पॉझिटिव्ह आढळले होते. हे लोक 'कोरोनास्प्रेडर' ठरत असून धोकादायक बनत आहेत. या घटनेने प्रशासनाची आणखी चिंता वाढू लागली आहे. Action against people walking on the streets of Islampur without any reason

वाळवा Walva तालुका आरोग्य विभागाने ही कारवाई केली आहे. पॉझिटिव्ह आढळलेले हे आठजण वाळवा तालुक्यातील रेठरे Rethare आणि शिवपुरी Shivpuri येथील आहेत. तर एक व्यक्ती सांगलीहुन इस्लामपुरात कामाच्या निमित्ताने आली होती. पालकमंत्री जयंत पाटील Jayant Patil यांनी वाळवा तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहाता सर्व प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक घेतली आहे. त्यातमध्ये तालुक्यात कडक उपाययोजना अमंलात आणण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार इस्लामपूर शहर व इतर ग्रामीण भागातील विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कारवाईचा बडगा उगरण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. वाळवा पंचायत समिती, आरोग्य विभाग, नगरपालिका व पोलिस Police प्रशासनाने फिरते कोविड १९ तपासणीचे पथक तयार करून अंमलबजावणी सुरू केली आहे.

परवा ९७ जणांची तपासणी झाली होती. त्यातमध्ये ३ पॉझिटिव्ह आढळले आहेत. काल सकाळी शिराळा नाक्यावर धक्कादायकरित्या ८ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांच्यावर कोविड Covid सेंटरमध्ये उपचाराची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live