पोहरादेवी गर्दी प्रकरणी कारवाई

साम टीव्ही
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

पोहरादेवीच्या गर्दी प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर वाशिम पोलिसांनी कारवाईला सुरूवात केलीय. तब्बल 10 हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.

पोहरादेवीत गर्दी जमवल्याप्रकरणी वाशिम पोलिसांनी कारवाईला सुरूवात केलीय. तब्बल दहा हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत, पण गर्दीला जबाबदार असणाऱ्यांना मात्र अभय देण्यात आलंय.

पोहरादेवीच्या गर्दी प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर वाशिम पोलिसांनी कारवाईला सुरूवात केलीय. तब्बल 10 हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. 

पोहरादेवीत संजय राठोड यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी गर्दी करावी यासाठी समाज माध्यमांवर नियोजित मोहिम राबवण्यात आली होती. त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी गर्दी रोखण्यासाठी महंतांना नोटीस बजावल्या होत्या. त्यामुळे या महंतांवर कारवाई का नाही असा सवाल उपस्थित होतोय. शिवाय ज्यांच्यासाठी ही गर्दी जमली होती त्या संजय राठोडांवरही गुन्हा का दाखल झाला नाही, या प्रश्नावर पोलिस अधिक्षकांनी मौन बाळगणं पसंत केलंय.

हा सगळा प्रकार पाहता मुख्यमंत्र्यांना खरंच या प्रकरणी हीच कारवाई अपेक्षित आहे का असा सवाल विचारला जातोय. साम टीव्ही 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live