नवी मुंबईत RTPCRचे बोगस रिपोर्ट्स देणाऱ्या लॅबवर कारवाई...(पहा व्हिडिओ)

साम टीव्ही ब्युरो
शनिवार, 17 एप्रिल 2021

नवी मुंबई येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. RTPCRचे बोगस रिपोर्ट्स बोगस धंदा सुरु आहे.  या मध्ये निगेटिव्ह रिपोर्ट्स दाखवण्यात आलेल्या दोन लॅब वर कारवाई करण्यात आली

नवी मुंबई : कोरोनाचा Corona प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातच नवी मुंबई Navi Mumbai येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. RTPCRचे बोगस रिपोर्ट्स बोगस धंदा सुरु आहे.  या मध्ये निगेटिव्ह Negative रिपोर्ट्स दाखवण्यात आलेल्या दोन लॅबवर Lab कारवाई करण्यात आली आहे. Action on RTPCRs lab giving bogus reports in Navi Mumbai 

या लॅब कडून प्रवीण इडस्ट्रीअलच्या १२३ कामगारांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह दाखवण्यात आले. दरम्यान नवी मुंबई पोलिसांनी Police ठाणेतील मिडटाउन लॅब आणि कल्याणमधील परफेक्ट हेल्थ पायथॉलॉजी Midtown Lab and Perfect Health Pathology या दोन्ही लॅबचे मालक मोहंमद वसीम शेख आणि देविदास घुले या दोघांना अटक केली आहे. 

या सर्व प्रकारात थायरोकेअर Thyrocare या अधिकृत लॅबचे बनावट लेटर हेड वापरण्याची  धक्कादायक माहिती मिळत आहे. या दोघांनी या कॅम्पमधून त्यांनी १३३ सॅम्पल प्रत्येकी ६५० रुपये प्रमाणे प्रवीण इडस्ट्रीअलकडून ८६ हजार ४५० रुपये घेतले आहेत. त्यांनी आपल्या कॉम्पुटरवरून  थायरोकेलरच्या लेटरहेडवर रिपोर्ट् दाखल केले. सर्व निगेटिव्ह असल्याचे रिपोर्ट्स त्यांना दिले गेले आहे. या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या दोन्ही आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. 

Edited By- Digambar Jadhav     


संबंधित बातम्या

Saam TV Live