नवापूर तालुक्यातील आडमार्गाने जाणाऱ्या खासगी बसेसवर कारवाईला सुरुवात

दिनू गावित
गुरुवार, 20 मे 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील नवापूर तपासणी नाक्यावर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी बंधनकारक असतानाही शासनाचा महसूल बुडवून नवापुर तालुक्यातील खेडे गावांमधून खाजगी लक्झरी बसेसचा रात्रीतून प्रवास सुरू आहे.  

नंदुरबार -  कोरोनाचा Corona प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील नवापूर Navapur तपासणी नाक्यावर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी बंधनकारक असतानाही शासनाचा महसूल बुडवून नवापुर तालुक्यातील खेडे गावांमधून खाजगी लक्झरी बसेसचा private buses रात्रीतून प्रवास सुरू आहे.  Action started on private buses

हे देखील पहा -

अशी बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव Nanasaheb Bachav यांनी तीन पथकांची नियुक्ती करून कारवाईला सुरुवात केली आहे. शासनाचा महसूल बुडवून आडमार्गाने जाणाऱ्या सहा बसेस वर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. Action started on private buses

राजस्थानात पहिल्यांदा दारूबंदी आणणारे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडियांचे निधन

कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करावी तसेच महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील आमलाण, बेडकी, बंधारफळी, गडद, नोयीहोंडा गावातून जाणाऱ्या खासगी बस व अवजड वाहने कायमचे बंद करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live