संचारबंदीचा नियम मोडणाऱ्या दिडशे जणांवर कारवाईचा दंडुका !

अभिजीत घोरमारे
सोमवार, 3 मे 2021

जगभरात कोरोनाचा अहंकार माजला आहे. कोट्यवधी लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. कोरोनाच्या या विळख्यामध्ये काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्वांवर शहरासह राज्यात लॉक डाउन घोषित केलं आहे

गोंदिया : जगभरात कोरोनाचा Corona अहंकार माजला आहे. कोट्यवधी लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. कोरोनाच्या या विळख्यामध्ये काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्वांवर शहरासह राज्यात लॉक डाउन Lockdown घोषित केलं आहे. पण नागरिक या लॉक डाउन मध्ये मोकाट व निष्काळजीपणे फिरत असताना दिसत आहेत. Action taken against 150 people for violating curfew 

या अनुषंगाने जिल्ह्यात जमावबंदी व सचारबंदीचे Curfew आदेश जाहिर करण्यात आले आहेत. असे असताना देखील अनेकांकडून या आदेशाची Order पायमल्ली होत असल्याचेही पुढे येत आहे. दरम्यान, यावर प्रतिबंधक लावण्यासाठी शहरातील जिल्हा वाहतूक पोलिस Police शाखा, रामनगर Ramnagar पोलिस ठाणे व शहर पोलिसांच्या वतीने गस्त व नाकाबंदी करण्यात आली आहे.

पोलिसांकडून शहरातील विविध भागात नाकाबंदी व गस्त घालण्यात येत होती. यादरम्यान शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना चांगलीच कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान १४६ जणांवर कारवाईचा दंडुका फिरवण्यात आले आहे. ज्यामध्ये ९८ जणांविरुध्द गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यामध्ये ४८ जणांकडून ९ हजार २०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live