अकोल्यात पंधरा दिवसात विनाकारण फिरणाऱ्या आठ हजार वाहनांवर कारवाई

जयेश गावंडे
सोमवार, 3 मे 2021

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यसरकार ने राज्यासह जिल्ह्यात दिनांक 15 एप्रिल पासून त्या अंतर्गत संचारबंदी लागू केली. गेल्या पंधरा दिवसाच्या कालावधीत अकोल्यातील वाहतूक पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या तब्बल आठ हजारांवर वाहनांवर कारवाई केली आहे.

अकोला: कोरोनाचा Corona वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यसरकार State government ने राज्यासह जिल्ह्यात दिनांक 15 एप्रिल पासून त्या अंतर्गत संचारबंदी Curfew लागू केली. गेल्या पंधरा दिवसाच्या कालावधीत अकोल्यातील वाहतूक पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या तब्बल आठ हजारांवर वाहनांवर कारवाई केली आहे. Action was taken against 8000 vehicles in Akola district

राज्यात लॉकडाऊन Lockdown लावण्यात आल्यानंतर फक्त जीवनावश्यक वस्तूची दुकाने, मेडिकल वगळता सर्व आस्थापने बंद करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुद्धा निर्धारित वेळेतच सुरू ठेवली गेली. कोरोनाचा वाढता संसर्ग कमी व्हावा आणि कोरोनाची साखळी तुटावी Break the chain ह्या उद्देशाने लागू केलेल्या ह्या लॉकडाऊनचा मूळ उद्देश लोकांची गर्दी कमी करणे हा होता. शासनाचा उद्देश सफल करण्यासाठी तसेच लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी पोलीस विभागाला महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करत आहेत. 

तसेच शहर वाहतूक शाखेला सुद्धा कारवाईचे निर्देश दिले गेले आहेत. त्या अनुषंगाने शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ आपल्या वाहतूक सहकारीसह रोडवर उतरले आणि विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहन धारकांवर दंडात्मक तसेच वाहन जप्तीची धडक कारवाई  केली. त्या अंतर्गत दिनांक १५ एप्रिल ते ३० एप्रिल ह्या लॉकडाऊन च्या पहिल्या चरणात शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई केलेली आहे. Action was taken against 8000 vehicles in Akola district

जवळपास 8 हजार वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई करून साडे पाच लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच काहीही कारण नसतांना रस्त्यावर आढळून येणारी जवळपास 350 वाहने शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये जप्त करण्यात आली आहे . सदर वाहन चालकांवर आचारसंहिता भंग आणि इतर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या निर्देशा प्रमाणे सदरची कारवाई शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी केली.

Edited By- Sanika Gade

 

संबंधित बातम्या

Saam TV Live