मंगल कार्यालयं, कोचिंग क्लासवर कारवाई होणार

साम टीव्ही
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

अनेक ठिकाणी नियम बासनात गुंडाळून भव्य-दिव्य विवाह सोहळे आयोजित केले जातायत. ही सगळी परिस्थिती पाहता, विभागीय आयुक्तांनी कडक पावलं उचलण्याचे आदेश दिलेयत .   

कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जातेय. कारण, अनलॉक जाहीर झालं असलं तरी, अनेकजण त्याचा गैरफायदा घेत असल्याचं उघड झालंय अनेकजण मास्क न वापरता फिरतायत. सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडतोय. तर अनेक ठिकाणी नियम बासनात गुंडाळून भव्य-दिव्य विवाह सोहळे आयोजित केले जातायत. ही सगळी परिस्थिती पाहता, विभागीय आयुक्तांनी कडक पावलं उचलण्याचे आदेश दिलेयत .  

सर्दी, ताप असूनही फिरणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याबाबतची क्लिप वापरावी) व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपमधील आवाज विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांचा असल्याचं बोललं जातंय. मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी हे आदेश दिल्याचं समजतंय. अनेक लोक सर्दी, ताप असूनही जाहीरपणे फिरत असल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिलेयत. इतकंच नाही तर, नियम मोडत मोठ-माठाले विवाहसोहळे करणाऱ्या मंगल कार्यालयांबाबत त्यांनी काय आदेश दिलेयत, .

मंगल कार्यालयांवर धडक कारवाई करण्याची वेळ का आलीय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, त्याचं कारण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. यातून मंगल कार्यालय संचालकांची नफेखोरीसाठीची बेजबाबदारी तुमच्या लक्षात येईल.

हे तर झालं, मंगल कार्यालयांचं, पण अनेक खासगी कोचिंग क्लासमध्येही कोरोनाबाबतची काळजी घेतली जात नसल्याचं उघड आलंय. म्हणून सुनील केंद्रेकरांनी कोचिंग क्लासेसवरही कारवाई करण्याचे आदेश दिलेयत.

ही सगळी परिस्थिती पाहता, मंगल कार्यालयं असो, कोचिंग क्लास असो किंवा सर्दी-ताप असूनही बिदिक्कत फिरणारे नागरिक असो... जे जे लोक बेजबाबदारपणे वागतायत, ते स्वत:सोबतच इतरांच्याही जीवाशी खेळ मांडतायत. हे असंच सुरू राहिलं तर, पुन्हा कडक लॉकडाऊनची वेळ येऊ शकते, हे कुणीच विसरता कामा नये.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live